अफगाणिस्तान टेस्टमधून डच्चू, पण रोहित म्हणतो ‘वरी नॉट’!

अफगाणिस्तान टेस्टमधून डच्चू, पण रोहित म्हणतो ‘वरी नॉट’!

रोहित शर्मा, क्रिकेटपटू

गेल्या अनेक दिवसांपासून आऊट ऑफ फॉर्म चाललेल्या भारतीय बॅट्समन रोहित शर्मावर अफगाणिस्तान कसोटीमधून डच्चू मिळण्याची वेळ ओढवली आहे. मात्र, यामुळे गडबडून न जाता ‘आपल्याला आता टेस्ट मॅचमध्ये सिलेक्शन झालं किंवा नाही याचा फरकच पडत नाही’ अशी प्रतिक्रिया रोहित शर्माने दिली आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या या माजी कप्तानाचा अॅटिट्यूड कितीही कूल वाटला, तरी परफॉर्मन्स नसल्यामुळेच त्याला संघातून काढल्याचं वास्तव मात्र बदलत नाही.

रोहितला कसोटी संघात स्थान नाही

टेस्टमध्ये आऊट ऑफ फॉर्म चाललेला रोहित शर्मा नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या ११व्या सीझनमध्येही विशेष छाप पाडू शकला नाही. त्यामुळे, एकंदरीतच त्याच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यातच रोहित शर्माला अफगाणिस्तान विरोधात होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी संघात स्थान मिळाले नसल्यामुळे त्याच्याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे.

रोहित म्हणतो, चिंतेत रहाण्याचे दिवस संपले!

मात्र, फक्त वन डेमध्येच कसाबसा आपला फॉर्म टिकवून ठेवलेल्या रोहित शर्माने आपल्याचा कसोटी संघातून वगळलं, तरी फरक पडत नसल्याचं म्हटलं आहे. माझं अर्ध करिअर संपलं असून आता मला संघात स्थान मिळेल की नाही या चिंतेत रहाण्याचे माझे दिवस राहिलेले नाहीत. त्यामुळे आता जेवढा वेळ माझ्याकडे आहे, तो पूर्णपणे माझ्या खेळावर केंद्रीत करणार आहे’, असं रोहित म्हणतो.

टेस्टमध्ये चढ- उतार

वनडे आणि टी २० क्रिकेट स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावावर आहेत. म्हणूनच त्याला ‘हिटमॅन’ म्हणतात. या तुलनेत टेस्ट मॅचमधील रोहितच्या करिअरचा ग्राफ म्हणावा इतका चांगला नाही. आतापर्यंत रोहितने फक्त २५ टेस्ट मॅच खेळल्या आहेत. ज्यात त्याने केवळ ३ सेंच्युरी आणि ९ हाफसेंच्युरी केल्या आहेत. मात्र, असं असलं तरी वनडे मध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर रोहित शर्माच्या वनडे टीममधील स्थानाला कुणी इतक्यात धक्का लावू शकेल असं मात्र चित्र नाही.

रोहित शर्माचे टेस्टमधून निवृत्तीचे संकेत?

एकीकडे बीसीसीआय आणि निवड समिती रोहित शर्माला टेस्ट टीमध्ये घेण्यासाठी तयार नसताना दुसरीकडे रोहित शर्माही ‘कसोटीतलं अर्धं करिअर संपलं आहे’ असं म्हणत आहे. शिवाय ‘आता आपल्या फक्त खेळावर लक्ष केंद्रीत करायचं आहे’ असंही रोहितने सांगितल्यामुळे रोहित शर्मा लवकरत कसोटीमधून निवृत्ती स्विकारणार का? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

First Published on: May 29, 2018 6:41 AM
Exit mobile version