IPL 2020 : रोहित शर्माने केवळ यंदाच्या आयपीएलचा विचार करू नये – गांगुली 

IPL 2020 : रोहित शर्माने केवळ यंदाच्या आयपीएलचा विचार करू नये – गांगुली 

रोहित शर्मा आणि सौरव गांगुली

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी काही दिवसांपूर्वी भारताच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही संघांची घोषणा करण्यात आली होती. प्रमुख सलामीवीर, तसेच एकदिवसीय आणि टी-२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचा या तिन्ही संघांमध्ये समावेश नव्हता. रोहितला १८ ऑक्टोबरला झालेल्या किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या आयपीएल सामन्यात पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे रोहित त्यानंतरच्या सामन्यांत खेळू शकलेला नाही. आता रोहितचा मुंबई इंडियन्स संघ गुरुवारी प्ले-ऑफमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार आहे. मात्र, रोहितने हा सामना खेळण्याची घाई करू नये, असे बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला वाटते.

रोहित सध्या जायबंदी आहे. रोहितला दुखापत नसती, तर आम्ही त्याला संघातून कशासाठी वगळले असते? तो भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा उपकर्णधार आहे. तो मैदानावर कधी परतेल हे सांगणे अवघड आहे. त्याला जेव्हापासून दुखापत झाली आहे, तेव्हापासून तो सामने खेळलेला नाही. त्याने दुखापतीतून पूर्णपणे बरे व्हावे असे आम्हाला वाटत आहे. भारताचे सर्वोत्तम खेळाडू सामने खेळण्यासाठी पूर्णपणे फिट कसे असतील, हे पाहणे बीसीसीआयचे काम आहे. रोहित दुखापतीतून सावरला, तर सामने खेळेल, असे गांगुली म्हणाला.

मुंबई इंडियन्सचे फिजिओ रोहितसोबत काम करत आहेत. भारताचे फिजिओसुद्धा (नितीन पटेल) त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. रोहित अजून बराच काळ क्रिकेट खेळू शकतो आणि हे त्यालाही माहित आहे. त्याने केवळ यंदाच्या आयपीएलचा किंवा पुढील आंतरराष्ट्रीय मालिकेचा विचार करू नये, असेही गांगुलीने नमूद केले.

First Published on: November 3, 2020 6:35 PM
Exit mobile version