या पठ्ठ्याने मोडला रोहित शर्माचा २६४ धावांचा रेकॉर्ड

या पठ्ठ्याने मोडला रोहित शर्माचा २६४ धावांचा रेकॉर्ड

रोहित शर्माच्या २६४ धावांचा रेकॉर्ड मोडीत निघाला

भारतीय संघाचे हिटर फलंदाज म्हणून प्रसिध्द असलेला आणि क्रिकेटच्या वनडे इतिहासामध्ये ३ दुहेरी शतक करणारा एकमेव असा फलंदाज म्हणजे रोहित शर्मा. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक २६४ धावा ठोकण्याचा रेकॉर्ड रोहितच्या नावावर आहे. रोहितचा २६४ धावाचा रेकार्ड संपूर्ण विश्वात प्रसिध्द आहे. मात्र रोहितचा हा रेकार्ड तुटल्यामुळे आता त्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. हा रेकॅार्ड तुटल्यामुळे रोहित कर्णधार असलेल्या मुंबई इंडियन्सने ट्विटरच्या माध्यामातून रोहित शर्माची सोशल मीडियावर खिल्ली उडवली आहे.

मात्र रोहितचा हा डोंगराएवढ्या धावांचा रेकॉर्ड तोडला तरी कोणी? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर हा रेकॉर्ड मुंबईच्या इंटर-स्कूल टूर्नामेंटमध्ये रिजवी स्प्रिंगफील्डच्या तर्फे खेळणाऱ्या अभिनव सिंगने मोडला आहे. मॅरोथॉन खेळीमध्ये २६५ धावा करुण रोहित शर्माच्या २६४ धावांचा विश्वविक्रम तोडला. परंतु हा रेकॉर्ड अजूनसुध्दा कोणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तोडला नाही.

IPL चा हंगाम सुरू व्हायला आता थोडे दिवस बाकी असताना, मुंबई इंडियन्सने सोशल मीडियाचा वापर करायला सुरुवात केली आहे. रोहितच्या २६४ धावांचा रेकार्ड मोडला गेलाय, असे कळताच मुंबई इंडियन्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट केले. “रोहित तुझ्या २६४ धावांची मजल गाठणारा खेळाडू आम्हाला मिळालाय” असे ट्विट केल्यामुळे सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. मात्र #CricketMeriJaa या अभियानातंर्गत मुंबई इंडियन्स स्थानिक खेळांडूना प्रोत्साहित करण्यासाठी अशाप्रकारचे ट्विट करत आहे.

२ मार्च पासून सुरू होणाऱ्या भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया वनडे सिरीजच्या तयारीसाठी रोहित शर्मा सध्या व्यस्त आहे. रोहित शर्माचे ऑस्ट्रेलियामध्ये प्रदर्शन चांगले असल्यामुळे होम गाऊंडवरील त्याचे चाहते रोहित शर्माच्या द्विशतकाची आशा करत आहेत. सध्या स्ट्रेलियासोबत टी-२० सीरीज सुरु असून भारताने दोन सामने गमावले आहेत. आता भारत या पराभवाचा बदला एकदिवसीय मालिकेत घेणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आहे.

First Published on: March 1, 2019 5:45 PM
Exit mobile version