धोनी तुझी कारकीर्द संपवेल; श्रीशांतचा बेन स्टोक्सला इशारा

धोनी तुझी कारकीर्द संपवेल; श्रीशांतचा बेन स्टोक्सला इशारा

भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतने इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सवर महेंद्रसिंग धोनीबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी इशारा दिला आहे. स्टोक्सने आता एकच प्रार्थना करावी की, पुन्हा धोनीशी पंगा व्हायला नको. जर पंगा झाला तर धानी करियर संपवून टाकेल. धोनी सर्व गोष्टी लक्षात ठेवतो, असं श्रीशांत म्हणाला.

अलीकडेच स्टोक्सने आपल्या ‘ऑन फायर’ पुस्तकात लिहिलं आहे की धोनी एकदिवसीय विश्वचषक २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात जिंकण्याचा प्रयत्न केला नाही. भारताच्या विजयाच्या आशा असूनही धोनी फटकेबाजी करत नव्हता. शेवटच्या १० षटकांत धोनीचा दृष्टीकोन पाहून स्टोक्स आश्चर्यचकित झालो.

धोनी काहीच विसरत नाही

इन्स्टाग्राम चॅट दरम्यान श्रीसंत म्हणाला की, “मी बेन स्टोक्सला सांगेन की धोनी भाई पुन्हा तुझ्याविरूद्ध खेळू नये अशी प्रार्थना कर.” धोनी काहीच विसरत नाही. स्टोक्सला शुभेच्छा देतो की आयपीएल किंवा इंग्लंड-भारत सामन्यात समोरासमोर येऊ नये. आतापर्यंत २ किंवा १ कोटी मिळत आहेत ना, धोनी भाई कारकिर्दच समाप्त करेल.”


हेही वाचा – यंदा टी-२० वर्ल्डकप लांबणीवर पडल्यास बीसीसीआयला आयपीएल घेण्याचा हक्क


 

First Published on: June 9, 2020 2:02 PM
Exit mobile version