Covid-19 : सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल

Covid-19 : सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल

भारतीय क्रिकेटमधील माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सचिनला आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती सचिनने आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. या ट्विटमध्ये सचिनने लिहिले आहे की, तुम्हा सर्वांचे आभार, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अधिकची खबरदारी घेत रुग्णालयात दाखल होत आहे. मी लवकरचं बरा होऊन पुन्हा घरी येईन. सर्वांनी आपली काळजी घ्या, सुरक्षित रहा, असे ट्विट केले आहे. मुंबईतील हरकिसनदास रुग्णालय सध्या सचिन तेंडूलकरवर उपचार सुरु आहेत.

याचबरोबर या ट्विटमध्ये सचिनने भारतीय क्रिकेट टीमने जिंकलेल्या वर्ल्डकपला आज १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तामात क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यावेळच्या टीममेलाही सचिनने ट्विटमधून शुभेच्छा दिल्या आहेत.

२७ मार्चला सचिनला कोरोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतले. मात्र आज खबरदारीचा उपाय म्हणून त्याला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्विट करूनच सचिनने पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. या ट्विटमध्ये त्याने म्हटले होते की, कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी मी नेहमी काळजी घेत नियम पाळत होतो. यासाठी अनेकदा मी कोरोना टेस्ट केल्या, मात्र आज माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी होम क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. देशवासियांनी आणि मला पाठिंबा देणाऱ्या सर्व आरोग्यसेवेचे आभार, असे त्याने म्हटले होते.


 

First Published on: April 2, 2021 11:33 AM
Exit mobile version