मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची बाधा

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची बाधा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्विटद्वारे माहिती दिली आहे. त्यात तो म्हणाला आहे ‘मला कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. मी सध्या माझी काळजी घेत असून होम क्वारंटाईन आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्या’, असे आवाहन सचिन तेंडूलकरने केले आहे. याशिवाय माझ्या घरातील मंडळींची कोरोनाची चाचणी केली असता त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे’, अशी माहिती क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी दिली आहे.

क्रिकेट पटू सचिन तेंडूलकरला सौम्य लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सचिन तेंडूलकरचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

राज्यात गेल्या काही दिवासांपासून कोरोनाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवाडीत वाढ होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच २८ मार्चपासून राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात २६ मार्च रोजी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत ३० हजाराने वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण राज्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या २४ तासांत ३६ हजार ९०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ११२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १७ हजार १९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण कोरोनाबाधितांची संख्या २६ लाख ३७ हजार ७३५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५३ हजार ९०७ जणांचा मृत्यू झाला असून २३ लाख ५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – फोन टॅपिंग अहवाल लिकप्रकरणी अखेर गुन्हा दाखल


First Published on: March 27, 2021 10:35 AM
Exit mobile version