Asian games 2018: सायना आणि सिंधू यांचे पदक नक्की

Asian games 2018: सायना आणि सिंधू यांचे पदक नक्की

सिंधू, सायनचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये सुरु असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडू उत्तम कामगिरी करत आहे. आता भारताच्या स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे आणि त्या पाठोपाठ पी.व्ही. सिंधूदेखील उपांत्यपूर्व फेरीत दाखल गेली आहे. त्यामुळे आता सायना आणि सिंधू यांचे पदक नक्की झाले आहे. सध्या पदक तालिकेत भारत २९ पदकांसह आठव्या स्थानावर आहे.

सायना आणि सिंधूने रचला इतिहास

महिला बँडमिटनच्या उपान्त्यपूर्व फेरीत दोन भारतीय महिला खेळाडू असण्याची ही पहिलीच वेळ आहे. सायना पाठोपाठ पी. व्ही. सिंधूने उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश करुन इतिहास रचला आहे. आता कोणत्या पदकावर या दोघी मोहर उठवतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


 भारतीय खेळाडूंना दिल्या शुभेच्छा 

राज्यवर्धन राठोड यांनी ट्विटरवरील एका व्हिडिओतून भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देत तुमचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. ते सध्या जकार्तामध्ये असून त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन अनेक फोटो शेअर केला आहे.

First Published on: August 26, 2018 3:36 PM
Exit mobile version