सानिया मिर्झाने हा पुरस्कार जिंकून रचला इतिहास, रिलीफ फंडाला दिली पुरस्काराची रक्कम

सानिया मिर्झाने हा पुरस्कार जिंकून रचला इतिहास, रिलीफ फंडाला दिली पुरस्काराची रक्कम

टेनिस स्टार सानिया मिर्झा आई बनल्यानंतर टेनिस कोर्टवर यशस्वी पुनरागमनासाठी सोमवारी फेड कप हार्ट पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय ठरली. या विजयाचे पैसे तेलंगणा सीएम रिलीफ फंडामध्ये देण्याचा निर्णय तिने घेतला आहे. याची घोषणा तिने सोशल मीडियावरही केली. सानियाला आशिया ओशनिया प्रदेशासाठी पुरस्कार देण्यात आला. एकूण १६,९८५ पैकी तिला १० हजाराहून अधिक मते मिळाली. फॅड कप हार्ट पुरस्कार विजेता चाहत्यांच्या मताच्या आधारे निवडला जातो. या पुरस्कारासाठी मतदान १ मेपासून सुरू झालं.

एकूण ६० टक्के मते मिळालेल्या सानियाने अखिल भारतीय टेनिस असोसिएशनद्वारे दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “फेड कप हार्ट पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय म्हणून अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार मी संपूर्ण देशाला आणि माझ्या चाहत्यांना समर्पित करते. भविष्यात मी देशासाठी आणखी यश मिळवण्याचा प्रयत्न करेन.”


हेही वाचा – भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा झाल्यास बीसीसीआयबद्दल आदर वाढेल!


सानिया चार वर्षानंतर फेड कपमध्ये परतली आणि इतिहासात प्रथमच भारताने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. ऑक्टोबर २०१८ मध्ये आपला मुलगा इझहानला जन्म दिल्यानंतर सानिया यावर्षी जानेवारीत टेनिस कोर्टवर परत आली आणि नाडिया किचेनोकसमवेत होबार्ट आंतरराष्ट्रीय किताब जिंकला. प्रत्येक प्रकारात बक्षीस विजेत्यास दोन हजार डॉलर्स मिळतात. सानियाने तेलंगणाच्या मुख्यमंत्री मदत निधीला ही रक्कम दिली.

 

First Published on: May 12, 2020 11:16 AM
Exit mobile version