घरक्रीडाभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा झाल्यास बीसीसीआयबद्दल आदर वाढेल!

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा झाल्यास बीसीसीआयबद्दल आदर वाढेल!

Subscribe

गौतम गंभीरचे मत

भारतीय क्रिकेट संघाचा यावर्षाच्या अखेरीस होणारा ऑस्ट्रेलिया दौरा ठरल्याप्रमाणे झाल्यास माझा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबद्दल (बीसीसीआय) आदर वाढेल, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन सरकारने आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे यावर्षीच होणार्‍या टी-२० विश्वचषक आणि भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका व्हावी यासाठी भारतीय संघ दोन आठवडे क्वारंटाईनमध्ये राहण्यास तयार असल्याची माहिती बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी दिली होती.

याबाबत गंभीरला विचारले असता तो म्हणाला, बीसीसीआयसाठी ही चांगली गोष्ट आहे. ही सकारात्मक बाब आहे. माझ्या मते ते पुढचा विचार करत आहेत. त्यांचा विचार फक्त क्रिकेटपुरता मर्यादित नाही. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा झाला, तर दोन्ही देशांतील वातावरण थोडे बदलेल. ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकणे महत्त्वाचेच आहे, पण आता फक्त इतकाचा विचार करुन चालणार नाही. या मालिकेमुळे फक्त भारतच नाही, तर ऑस्ट्रेलियातील वातावरण बदलेल. त्यांच्यात सकारात्मकता येईल.

- Advertisement -

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात चार कसोटी सामने खेळणार आहे आणि ही मालिका न झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे ३०० मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे नुकसान होऊ शकेल. बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत संघटना असल्याने त्यांना व्यापक विचार करावा लागेल असे गंभीरला वाटते. बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली क्रिकेट संघटना आहे. त्यामुळे त्यांना तात्पुरता विचार करुन चालणार नाही. त्यांना व्यापक विचार करावा लागणार आहे आणि बहुदा ते हेच करत आहेत. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केल्यास माझा बीसीसीआयबद्दल आदर वाढेल, असे गंभीरने सांगितले.

कशाच्या आधारावर ऑस्ट्रेलिया अव्वल?

- Advertisement -

नुकतेच भारतीय संघाने आपले कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान गमावले, तर ऑस्ट्रेलियन संघाने अव्वल स्थानी झेप घेतली. त्यामुळे गंभीरने क्रमवारीवर टीका केली. आयसीसी क्रमवारी, तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गुणांकन पद्धत हास्यास्पद आहे. तुम्हाला जितके गुण घरच्या मैदानावर जिंकल्यावर मिळतात, तितकेच गुण परदेशात जिंकल्यावर मिळतात. याला काहीच अर्थ नाही. भारतीय संघाने परदेशात कसोटी मालिका गमावल्या आहेत, पण त्यांनी झुंज दिली. त्यांनी ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली. इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने जिंकले. याऊलट ऑस्ट्रेलियाने परदेशात खराब कामगिरी केली आहे. मग कशाच्या आधारावर ते अव्वल स्थानी पोहोचले?, असे गंभीर म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -