संजू सॅमसन अडकणार लग्नाच्या बेडीत, फेसबुकवर जाहीर केल प्रेम

संजू सॅमसन अडकणार लग्नाच्या बेडीत, फेसबुकवर जाहीर केल प्रेम

संजू सॅमसन म्हणाला की, रोहित त्याच्या जवळ येऊन बोलणाऱ्या व्यक्तींमधील पहिली व्यक्ती होती.

भारताच्या केरळचा असणारा संजू सॅमसन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याने ही घोषणा आपल्या ऑफिशिअल फेसबुक पेजवरून केली आहे. आपली कॉलेज मैत्रीण चारूसोबत तो लग्न करणार आहे. विशेष म्हणजे मागील पाच वर्षापासून तो ही घोषणा करण्याची वाट पाहत होता. मात्र आता अखेर घरच्यांच्या परवाणगीने संजूने हे जाहीर केले आहे.

काय आहे संजूची पोस्ट?

संजूने आपल्या ऑफिशिअल फेसबुकवरून त्याचा आणि त्याची मैत्रीण चारू हीचा फोटो टाकला असून त्यात त्याने लिहीले आहेकी,”मी २२ ऑगस्टला रात्री ११ वाजूल ११ मिनिटांनी चारूला ‘Hi’ असा मेसेज पाठवला होता. त्या गोष्टीला आता जवळपास ५ वर्षे झाली असून आतापर्यंत मी आमचा दोघांचा फोटो सोशल मीडियावर टाकायची वाट पाहतोय, आम्ही एकत्र एवढा वेळ घालवला मात्र सार्वजनिक ठिकाणी आम्हाला एकत्र कधीच फिरता येता आले नाही. पण आता अखेर आम्ही घरच्यांच्या परवाणगीने लग्न करणार आहोत आणि आम्हाला घरच्यांनी परवाणगी दिल्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत.”

२२ डिसेंबरला अडकणार लग्नबंधनात

संजूची मैत्रीण चारूचे वडील बी. रमेश कुमार एक वरिष्ठ पत्रकार आहेत. तसेच त्यांनी इंडो एशियन न्यूज सर्विस या वृत्तवाहीनीला दिलेल्या माहितीनुसार चारू आणि संजू हे २२ डिसेंबरला लग्न करणार आहेत. तसेच दोघांचे लग्न हे एकमेंकाच्या घरच्यांच्या परवाणगीने होणार आहे.

First Published on: September 9, 2018 4:59 PM
Exit mobile version