IPL 2021 : पंजाबविरुद्धची खेळी कारकिर्दीतील सर्वोत्तम!

IPL 2021 : पंजाबविरुद्धची खेळी कारकिर्दीतील सर्वोत्तम!

संजू सॅमसन

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने सोमवारी झालेल्या पंजाब किंग्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात शतकी खेळी केली. २२२ धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ अडचणीत सापडला होता. मात्र, सॅमसनने एक बाजू लावून धरत ६३ चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ११९ धावांची खेळी केली. हे त्याचे आयपीएल स्पर्धेतील तिसरे शतक ठरले. मात्र, अखेरच्या चेंडूवर पाच धावांची आवश्यकता असताना सॅमसन बाद षटकार मारताना झाला आणि राजस्थानने सामना गमावला. परंतु, सॅमसनच्या या खेळीचे आजी-माजी क्रिकेटपटूंनी कौतुक केले. या शतकाबाबत स्वतः सॅमसनही समाधानी होता.

मला लय सापडली

डावाच्या सुरुवातीला मला धावांसाठी झुंजावे लागत होते. चेंडू बॅटच्या मध्यभागी लागत नव्हता. त्यामुळे मी थोडा वेळ घेतला, गोलंदाजांना आदर दिला, एक-दोन धावा काढण्यावर भर दिला आणि त्यानंतर मला लय सापडली. त्यामुळे या डावाच्या उत्तरार्धात मी फटके मारण्यास सुरुवात केली. ही खेळी, खासकरून या डावाच्या उत्तरार्धात केलेली फलंदाजी ही माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम होती, असे सॅमसन सामना संपल्यावर म्हणाला.

संतुलन साधून फलंदाजीचा प्रयत्न

मला फटकेबाजी करायला आवडते. मात्र, मी आक्रमण आणि बचाव यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो. मी जेव्हा माझ्या खेळावर आणि चेंडूवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपोआपच मला फलंदाजी करणे आणि फटके मारणे सोपे जाते. मी अधिक फटकेबाजी करण्याच्या नादात कधीतरी माझी विकेट गमावतो. त्यामुळे मी संतुलन साधून फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो, असेही सॅमसन सांगितले. तसेच राजस्थानचा संघ जिंकू शकला नसला, तरी मी संघाला जिंकवून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे समाधान असल्याचेही सॅमसन म्हणाला.

First Published on: April 13, 2021 10:33 PM
Exit mobile version