Road Safety World Series : सचिन-सेहवागची जोडी पुन्हा जमली; भारताने उडवला बांगलादेशचा धुव्वा

Road Safety World Series : सचिन-सेहवागची जोडी पुन्हा जमली; भारताने उडवला बांगलादेशचा धुव्वा

विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर

भारताचा महान सलामीवीर विरेंद्र सेहवागने तब्बल आठ वर्षांपूर्वी त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. मात्र, इतक्या वर्षांनंतरही त्याच्या फलंदाजीवर फारसा परिणाम झालेला नाही. शुक्रवारपासून रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज या स्पर्धेला पुन्हा सुरुवात झाली आणि सेहवागच्या फटकेबाजीमुळे भारताच्या लेजंड्स संघाने बांगलादेश लेजंड्सचा १० विकेट राखून धुव्वा उडवला. सेहवागने बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई करत ३५ चेंडूत १० चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ८० धावांची खेळी केली. त्याला त्याचा जुना साथीदार सचिन तेंडुलकरने २६ चेंडूत नाबाद ३३ धावांची खेळी करत उत्तम साथ दिली.

सेहवागचे २० चेंडूतच अर्धशतक

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज या स्पर्धेत शुक्रवारी भारत लेजंड्स आणि बांगलादेश लेजंड्स यांच्यातील सामना पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा डाव १०९ धावांत आटोपला. त्यांच्याकडून नझीमुद्दीनने एकाकी झुंज देत ४९ धावांची खेळी केली. भारताकडून विनय कुमार, प्रज्ञान ओझा आणि युवराज सिंग यांनी २-२ विकेट घेतल्या. भारताने ११० धावांचे लक्ष्य १०.१ षटकांतच गाठले. सेहवागने २० चेंडूतच अर्धशतक केले.

First Published on: March 5, 2021 10:05 PM
Exit mobile version