हा भेदभाव का ?

हा भेदभाव का ?

सौजन्य - BBC

अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जपानच्या नाओमी ओसाकाने सेरेना विल्यम्सचा पराभव करत विक्रम केला. ग्रँड स्लॅम जिंकणारी ती पहिली जपानी खेळाडू ठरली. मात्र, हा सामना ओसाकाच्या विक्रमापेक्षा सेरेना आणि या सामन्याचे अंपायर कार्लोस रामोस यांच्यात झालेल्या वादामुळे लोकांच्या जास्त लक्षात राहील.

काय झाला वाद ?

या सामन्याचा पहिला सेट सेरेनाने ६-२ असा मोठ्या फरकाने गमावला होता. तर दुसऱ्या सेटमध्ये ती ४-३ अशी मागे पडली होती. तेव्हाच सेरेना आणि या सामन्याचे अंपायर कार्लोस रामोस यांच्यात वाद सुरू झाला. अंपायर कार्लोस रामोस यांनी सेरेना सामना सुरू असताना आपल्या प्रशिक्षकांकडून सूचना घेत असल्याचे म्हटले. हे सेरेनाला फारसे आवडले नाही. त्यामुळे तिने अंपायरला खोटारडा आणि चोर असे शब्द सुनावले. तसेच तिने आपली रॅकेटही कोर्टवर आपटली. हे तिचे वर्तन पाहून अंपायरने ओसाकाला एक गुण देण्याचा निर्णय घेतला.

महिला खेळाडूंना वेगळी वागणूक 

हा सामना संपल्यानंतर या प्रकरणाचे स्पष्टीकरण देताना सेरेना म्हणाली, “अंपायरने मी सामना सुरू असताना प्रशिक्षकाची मदत घेतल्याचा आरोप केला. मी तसे काहीही केले नव्हते. त्यामुळे मला राग आला. मी अनेक पुरुष खेळाडूंना रेफ्रीला चोर किंवा त्याहूनही वाईट गोष्टी म्हटल्याचे ऐकले आहे. पण त्यांचे गुण कधीही कमी केले जात नाहीत. मग मी महिला आहे म्हणून माझे गुण कमी केले जातात हे योग्य आहे का? मी महिला खेळाडूंसाठी आणि सामान हक्कांसाठी लढत होते आणि यापुढेही लढत राहणार आहे.”
First Published on: September 10, 2018 6:00 PM
Exit mobile version