IPL 2022: शाहरुख खानचा मोठा निर्णय; ‘या’ ठिकाणी बांधणार स्टेडीयम

IPL 2022: शाहरुख खानचा मोठा निर्णय; ‘या’ ठिकाणी बांधणार स्टेडीयम

बॉलीवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान याने क्रिकेटसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. शाहरुख खानने अमेरिकेत वर्ल्ड क्लास क्रिकेट स्टेडिअम बांधण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान आहे. तो अनेकदा त्यांच्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात पोहोचला आहे.
शाहरुख खानचे क्रिकेटविषयीचे प्रेम कुणापासून लपून राहिले नाही. त्याचा संघ केकेआर आणि यूएसए एमएसली म्हणजेच मेजर लीग क्रिकेट संयुक्तरित्या हे स्टेडियम उभे करणार आहेत. कोलकाताने त्यांच्या ट्वीटवर ही माहिती दिली आहे. लॉस एंजलिसमधील हे स्टेडियम 15 एकरमध्ये पसरलेले असेल. शुक्रवारी शाहरुखने स्वतः याविषयी माहिती दिली.

या स्टेडियममध्ये एका वेळी 10 हजार प्रेक्षकांना सामन्याचा आनंद घेता येणार आहे. शाहरुखच्या संघाची यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या पर्वात कामगिरी निराशजनक ठरली आहे. कोलकाताने सुरुवातीच्या 9 सामन्यांपैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत आणि राहिलेल्या 6 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. गुणतालिकेत त्यांचा संघ सध्या 6 गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे.

यंदाच्या आयपीएलमधील 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. आजचा हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडणार आहे. राजस्थानने आतापर्यंत 9 पैकी 6 सामने जिंकत गुणतालिकेत टाप 4 मध्ये स्थान मिळवलं आहे. तर कोलकात्याचा संघ मात्र 9 पैकी 3 सामने जिंकल्याने अतिशय खालच्या स्थानावर आहे.

कोलकाता – अॅरॉन फिंच, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, नितीश राणा, बाबा इंद्रजीत (विकेटकिपर), आंद्रे रसेल, सुनिल नारायण, उमेश यादव, हर्षीत राणा, टीम साऊथी.

राजस्थान – संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), जोस बटलर, देवदत्त पडीक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, करुन नायर, रवीचंद्रन आश्विन, ओबेद मॅकॉय, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल.


हेही वाचा – IPL 2022: चेन्नईच्या विजयानंतर धोनीला वगळत सुरेश रैनाचे ट्विटवरून ऋतुराज, कॉनवे यांचे कौतुक

First Published on: May 2, 2022 2:31 PM
Exit mobile version