घरक्रीडाIPL 2022: चेन्नईच्या विजयानंतर धोनीला वगळत सुरेश रैनाचे ट्विटवरून ऋतुराज, कॉनवे यांचे...

IPL 2022: चेन्नईच्या विजयानंतर धोनीला वगळत सुरेश रैनाचे ट्विटवरून ऋतुराज, कॉनवे यांचे कौतुक

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 पर्वात पराभवाच्या मालिकेला सामोरे जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने कालच्या सामन्यात विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादवर 13 धावांनी चेन्नईने विजय मिळवला.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 पर्वात पराभवाच्या मालिकेला सामोरे जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने कालच्या सामन्यात विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादवर 13 धावांनी चेन्नईने विजय मिळवला. विशेष म्हणजे धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने हा विजय मिळवला. त्यामुळं या सामन्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या विजयानंतर चेन्नईचा माजी खेळाडू सुरेश रैना याने ट्विट केले. परंतु, या ट्विटमध्ये त्याने धोनीला टाळल्याचे पाहायाला मिळालं आहे.

महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) कर्णधार होताच चेन्नई सुपर किंग्जचे पुन्हा एकदा चांगले दिवस सुरू होताना दिसत आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने सनरायझर्स हैदराबादचा 13 धावांनी पराभव केला. या विजयानंतर चेन्नईच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत झाल्या आहेत. चेन्नईच्या विजयानंतर ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैनानेही आपली प्रतिक्रिया दिली. रैनाने ट्विट करून विजयाचे हिरो ठरलेल्या काही खेळाडूंची नावेही घेतली. पण पुन्हा एकदा तो धोनीबद्दल (एमएस धोनी) काहीच बोलला नाही.

- Advertisement -

“दोन्ही संघांची शानदार कामगिरी आणि शेवटी सीएसकेसाठी शानदार विजय. ऋतुराज आणि कॉनवे यांनी या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. या अतुलनीय विजयासाठी संपूर्ण संघाचे अभिनंदन!”, असं रैनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मिस्टर आयपीएल म्हणून ओळखले जाते

- Advertisement -

आयपीएलच्या इतिहासात असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी प्रत्येक हंगामात जबरदस्त खेळी केली आहे. सुरेश रैना देखील या फलंदाजांपैकी एक आहे. पहिल्या सत्रापासून चेन्नईकडून खेळत असलेल्या सुरेश रैनाने आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. हा खेळाडू गुजरात लायन्सचा 2 हंगाम कर्णधारही होता. रैनाने आपल्या कारकिर्दीत एकूण 205 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 5528 धावा केल्या आहेत. रैनाने 1 शतकासह 39 अर्धशतके झळकावली.


हेही वाचा – IPL 2022 : यंदाच्या आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूने टाकला सर्वात वेगवान चेंडू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -