PAK vs BAN : शाकिबच्या विकेटवरून बांगलादेशच्या कर्णधाराचा पंचांशी वाद

PAK vs BAN : शाकिबच्या विकेटवरून बांगलादेशच्या कर्णधाराचा पंचांशी वाद

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याचा पंचाशी वाद झाला. विकेट ढापल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचे समजते. या सामन्यात पाकिस्तान बांगलादेशचा 4 विकेटसने विजय मिळवला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना, निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 127 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 18.1 षटकांत 5 गडी गमावून 128 धावा केल्या. त्याचबरोबर पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. (Shakib Al Hasan lbw first ball Bangladesh Pakistan T20 World Cup PAK vs BAN)

नेमका वाद काय ?

सौम्या सरकार बाद झाल्यानंतर 11व्या षटकात शाकिब फलंदाजीसाठी मैदानात आला. त्यावेळी पहिल्याच चेंडूवर त्याच्याविरुद्ध जोरदार अपील करण्यात आले. त्यानंतर थोडा वेळानी पंचांनी त्याला एलबीडब्ल्यू घोषित केले. त्यानंतर शाकिबने लगेचच डिआरएसची मागणी केली. त्यावेळी त्याला चेंडू बॅटला आदळून पायाला लागल्याचा विश्वास होता. परंतु, स्निकोमीटरमध्येही आवाज स्पष्ट दिसत होता.

बाद घोषित दिल्यानंतर शकीब अल हसनवर विश्वास बसत नव्हता. त्याने मैदानावरील पंचांशी वाद घातला आणि आपली बाजू मांडली. पण बाद दिल्यानंतर काहीही होऊ शकत नाही. पंचांनी त्याला मैदान सोडण्यास सांगितले. परिणामी शाकिब खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.


हेही वाचा – बलात्काराच्या आरोपाखाली ऑस्ट्रेलियात श्रीलंकेचा क्रिकेटर दनुष्का गुणतिलकाला अटक

First Published on: November 6, 2022 4:17 PM
Exit mobile version