BBL 2020 : नव्या नियमांची गरजचं काय?; शेन वॉटसन भडकला 

BBL 2020 : नव्या नियमांची गरजचं काय?; शेन वॉटसन भडकला 

शेन वॉटसन

ऑस्ट्रेलियातील स्थानिक टी-२० स्पर्धा ‘बिग बॅश लीग’च्या यंदाच्या मोसमाला १० डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. बिग बॅश लीगच्या यंदाच्या म्हणजेच दहाव्या मोसमात ‘पॉवर सर्ज’, ‘एक्स फॅक्टर प्लेयर’ आणि ‘द बॅश बूस्ट’ असे तीन नवे नियम पाहायला मिळणार आहेत. मात्र, नवे नियम लागू करणे ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसनला फारसे आवडलेले नाही. ‘मी आज वाचले की, बिग बॅश लीगमध्ये पॉवर सर्ज, एक्स फॅक्टर प्लेयर आणि द बॅश बूस्ट असे तीन नवे नियम उगाचच लागू करण्यात येणार आहेत. या नियमांमुळे बिग बॅश लीगला अधिक लोकप्रियता मिळेल असा गैरसमज आहे. टी-२० क्रिकेटमध्ये कोणत्याही नव्या गोष्टींची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. तरीही लोकांना नवे नियम बनवण्यात काय मजा येते? हेच मला कळत नाही,’ असे वॉटसन म्हणाला.

काय आहेत नवे नियम?

बिग बॅश लीगमध्ये यंदा तीन नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. ‘पॉवर सर्ज’ नियमानुसार, फलंदाजी करणाऱ्या संघाला १० षटकांनंतर दोन षटकांचा पॉवर-प्ले घेण्याची परवानगी असणार आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सुरुवातीची सहा षटके पॉवर-प्लेची असतात. मात्र, बिग बॅशमध्ये पहिला पॉवर-प्ले चार षटकांचा असणार आहे. ‘एक्स फॅक्टर प्लेयर’ नियमानुसार, संघांना १० षटकांनंतर बदली खेळाडू घेण्याची परवानगी असणार आहे. तर ‘द बॅश बूस्ट’ नियमानुसार, १० षटकांनंतर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाची धावसंख्या ही प्रथम फलंदाजी केलेल्या संघाच्या १० षटकांनंतरच्या धावसंख्येहून अधिक असल्यास त्या संघाला एक बोनस गुण मिळणार आहे.

First Published on: November 18, 2020 8:13 PM
Exit mobile version