शौर्याची ’गोल्डन धाव’, सुवर्ण कामगिरीची हॅट्रिक

शौर्याची ’गोल्डन धाव’, सुवर्ण कामगिरीची हॅट्रिक

मुंबई : ठाण्याच्या युनिव्हर्सल हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणार्‍या शौर्या अंबुरे हिने चिपळूणचे डेरवण गाजवले. नुकत्याच पार पडलेल्या ९ व्या ’डेरवण युथ गेम्स’ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील तीन वेगवेगळ्या धावण्याच्या स्पर्धेत शौर्याने सुवर्ण कामगिरीची हॅट्रिक साधली. त्यामुळे ती अंडर-१४ धावणी स्पर्धेतील ’गोल्डन’ धावपटु ठरली. (Shaurya Ambure 9th Dervan Youth Games Athletics Competition Golden Runner)

श्री विठ्ठल राव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या वतीने ७ ते १० मार्च दरम्यान डेरवण युथ गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारात राज्यातील पाच हजार विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. शौर्या अंबुरे हिने अंडर- १४ च्या ६० मी., १०० मी. आणि १५० मीटर या तिन्ही धावणी स्पर्धेत जबरदस्त दौड करून सुवर्ण पदकांना गवसणी घातली.

१०० मीटर धावणी स्पर्धा शौर्याने १२.७ सेकंदात पुर्ण करण्याची कामगिरी केली. या स्पर्धांमध्ये शौर्या सर्वाधिक वेगवान धावपटू ठरली.  यापुर्वी तिने सीआयएससीई या राज्य स्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेतही घवघवीत यश मिळवले होते.

शौर्या हि ठाण्यातल्या ’एम स्पोट्स अ‍ॅन्ड फिटनेस’ येथे डॉ.अजित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे आणि अविनाश अंबुरे यांची शौर्या कन्या आहे.


हेही वाचा – पंतप्रधान मोदींकडून सानियाचं कौतुक, पत्र शेअर करत म्हणाली…

First Published on: March 12, 2023 7:52 PM
Exit mobile version