IND vs NZ: कर्णधार शिखर धवनचा मोठा विक्रम; विराट-धोनीसारख्या दिग्गज खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील

IND vs NZ: कर्णधार शिखर धवनचा मोठा विक्रम; विराट-धोनीसारख्या दिग्गज खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील

कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात पराभव झाला आहे. या सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी, कर्णधार शिखर धवनने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. शिखर धवनने कर्णधारपदाची खेळी खेळली होती. धवनची ही खेळी अनेक अर्थांनी खास होती. या खेळीनंतर धवन विराट कोहली, एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गजांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. (shikhar dhawan complete 12000 runs in list a cricket ind vs nz 1st odi match)

शिखर धवनने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात संघासाठी कर्णधारपदाची खेळी खेळून शानदार सुरुवात केली. त्याने 77 चेंडूंचा सामना करत 72 धावा केल्या. शिखर धवनने या खेळीत 13 चौकार मारले. या खेळीसह शिखर धवनने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 12000 धावा पूर्ण केल्या.

शिखर धवनच्या आधी फक्त सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, विराट कोहली, एमएस धोनी आणि युवराज सिंग यांसारख्या भारतीय फलंदाजांना लिस्ट ए क्रिकेटमध्ये 12000 धावा करता आल्या आहेत. शिखर धवनने केवळ 297 सामन्यांमध्ये ही खास कामगिरी केली, जरी विराट कोहलीने केवळ 242 डावांमध्ये ही कामगिरी केली होती.

या सामन्यात शिखर धवनसह शुभमन गिलने डावाची सुरुवात केली. या दोन फलंदाजांमध्ये पुन्हा एकदा शतकी खेळी पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडूंमध्ये पहिल्या विकेटसाठी केवळ 124 धावांची भागीदारी झाली. शुभमन गिलभीने 65 चेंडूत 50 धावा काढल्या.


हेही वाचा – IND vs NZ: न्यूझीलंडचा पहिल्या वनडे सामन्यात भारतावर दमदार विजय

First Published on: November 25, 2022 4:57 PM
Exit mobile version