विक्रम मोडण्यासाठी उमरानने आपली हाडे मोडू नयेत : शोएब अख्तर

विक्रम मोडण्यासाठी उमरानने आपली हाडे मोडू नयेत : शोएब अख्तर

यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या पर्वात सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून उमरान मलिकला ओळखलं जात आहे. उमरान सातत्याने ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करत आहे. या पर्वात उमरानने आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू म्हणजेच ताशी 157 किमी वेगाने चेंडू टाकला आहे. त्याच्या या गोलंदाजीमुळे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला भीती वाटत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा २० वर्ष जुना विक्रम मोडीत निघण्याची भीती शोएब अख्तरला आहे. त्यामुळे शोएब अख्तर याने उमरानला सल्ला दिला आहे. “माझा विक्रम मोडण्यासाठी उमरानने आपली हाडे मोडू नयेत”, असे त्याने म्हटलं.

“मला त्याची प्रदीर्घ कारकीर्द बघायची आहे. नुकतेच कोणीतरी माझे अभिनंदन केले की तुमच्या रेकॉर्डला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत कोणीही तो विक्रम मोडू शकलेला नाही. मग मी म्हणालो की कोणीतरी युवा गोलंदाज असावा ज्याने हा विक्रम मोडलाच पाहिजे. उमरानने जर माझा विक्रम मोडला तर मला आनंदच होईल. फक्त माझा विक्रम मोडताना त्याने स्वत:ची हाडे मोडून घेऊ नयेत. तो तंदुरुस्त राहो हीच माझी प्रार्थना आहे. त्याला दुखापतींचा सामना करायला लागू नये”, असं उमरान मलिकबद्दल शोएब अख्तर म्हणाला.

उमरानची टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड करावी का? यावरही त्याने प्रतिक्रिया दिली आहे. “त्याला नक्कीच संघात स्थान मिळायला हवं. मला त्याला खेळताना बघायचे आहे. १५० चा टप्पा ओलांडलेले फार कमी लोक आहेत. उमरान मलिक सातत्याने १५० पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत आहे. हे पाहून आनंद झाला. मला या नवीन मुलाची गोलंदाजी पाहायची होती. मला फिरकीपटू बघून कंटाळा आला आहे. पण उमरानची वेगवान गोलंदाजी पाहून खूप आनंद होतो”, असंही शोएब अख्तरने स्पष्ट केलं.


हेही वाचा – IPL 2022: खराब कामगिरी पण तरीही विराट कोहलीने रचला ‘हा’ नवा विक्रम

First Published on: May 15, 2022 2:56 PM
Exit mobile version