Ind vs Pak : पाकिस्तानी फॅन्समध्ये लाडका भारताचा इंझमाम कोण? शोएब अख्तर म्हणतो…

Ind vs Pak : पाकिस्तानी फॅन्समध्ये लाडका भारताचा इंझमाम कोण? शोएब अख्तर म्हणतो…

भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ जेव्हा आमने सामने येतात तेव्हा सामना फायनलपेक्षाही महत्वाचा असा सुपर सामना असतो. प्रत्येक सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमधील स्पर्धा ही पाहण्यासारखी असते. अनेकदा ही लढत दोन देशांमधील म्हणूनही पाहिली जाते. त्यामुळे अशा सामन्यांमध्ये क्रिकेट रसिकांचा आनंद हा शिगेला पोहचलेला असतो. सध्याच्या भारतीय संघातील दोन असे खेळाडू आहेत, ज्यांना पाकिस्तानात खूप महत्वाचे मानले जाते. (Shoaib Akhtar revealed who is known as india ka inzamam for pakistan cricket fans)

हे दोन्ही खेळाडून लवकर बाद व्हावेत म्हणूनही पाकिस्तानातील फॅन्स प्राथर्ना करतात. त्याचे कारण म्हणजे या दोन्ही खेळाडूंचा असणारा फॉर्म. कारण दोन्ही खेळाडूंमध्ये अशी क्षमता आहे, ज्यामुळे संपुर्ण सामन्याचे चित्र पालटणे शक्य होते. जगभरात खेळाडू म्हणून विराट कोहलीची कामगिरी सर्वोत्तम आहे, पण पाकिस्तानातील फॅन्सच्या पसंतीला मात्र रोहित शर्माच उतरतो. रोहितचे मोठ्या प्रमाणात असे फॅन्स पाकिस्तानात आहेत. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज ज्याला रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते, अशा शोएब अख्तरनेच हा खुलासा केला आहे.

शोएब अख्तरच्या माहितीनुसार पाकिस्तानातील फॅन्स हे रोहित शर्माला भारताचा इंजमाम म्हणून बोलले जाते. पाकिस्तानात विराट कोहलीपेक्षा क्रिकेट फॅन्सचे रोहित शर्मावर जास्त प्रेम आहे. रोहित हा पाकिस्तानतील क्रिकेट रसिक खूप आवडीचा आहे. जी न्यूज या वाहिनीशी बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, पाकिस्तानात भारतीय खेळाडूंचे खूपच फॅन्स आहेत. या क्रिकेटपटूंचे कौतुक पाकिस्तानातही केले जाते. विराटचे जितके कौतुक होते, त्यापेक्षाही अधिक चाहता वर्ग हा रोहित शर्माचा आहे, असे शोएब अख्तरने सांगितले. लाडाने रोहितला भारताचा इंझमाम म्हणून फॅन्स प्रेम करतात, असाही अनुभव शोएबने सांगितला. याआधी भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ जेव्हा २०१९ च्या सामन्यात खेळले होते, तेव्हा रोहितने या सामन्यात शतकी खेळी केली होती. त्यामुळे पाकिस्तानविरोधात भारताला एकतर्फी विजय मिळवणे शक्य झाले होते.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात आतापर्यंत टी २० सामन्यात पाच वेळा आमने सामने खेळले आहेत. या सामन्यात पाच वेळा भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे. आतापर्यंत पाकिस्तानला भारताविरोधात एकदाही विजय मिळवता आलेला नाही. फक्त टी २० नव्हेच, तर ५० षटकांच्या एकदिवसीय सामन्यातही पाकिस्तानचा सामना भारताशी झाला आहे. पण प्रत्येकवेळी या फॉरमॅटमध्येही भारताने बाजी मारली आहे. सातपैकी सात सामने भारतीय संघाने जिंकले आहेत.


हेही वाचा T20 World Cup 2021: ind vs pak जो संघ सामना जिंकेल, ५० टक्के…, इंझमाम उल हकची प्रतिक्रिया

First Published on: October 22, 2021 1:56 PM
Exit mobile version