Shoaib Akhtar : तर सचिन तेंडुलकरच्या १ लाखपेक्षा जास्त धावा असत्या, शोएब अख्तरचे मोठं विधान

Shoaib Akhtar : तर सचिन तेंडुलकरच्या १ लाखपेक्षा जास्त धावा असत्या, शोएब अख्तरचे मोठं विधान

Shoaib Akhtar : तर सचिन तेंडुलकरच्या १ लाखपेक्षा जास्त धावा असत्या, शोएब अख्तरचे मोठं विधान

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जर सध्याच्या घडीला भारतीय अष्टपैलू माजी खेळाडू सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळत असता तर त्याच्या १ लाखपेक्षा अधिक धावा झाल्या असत्या. पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तर नेहमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांवर प्रश्न उपस्थित करत असतो. या वेळी फलंदाजांच्या नियमांवरुन निशाणा साधला आहे.

पाकिस्तानचा दिग्गज माजी खेळाडू शोएब अख्तरने यावेळी भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरबाबत वक्तव्य केलं आहे. शोएब अख्तरने एका मुलाखतीमध्ये असे म्हटलं आहे की, तुम्ही आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन नवीन चेंडूंसह खेळता. तुम्ही नियम अधिक कडक केले आहेत. तुम्ही आता फलंदाजांवर जास्त लक्ष देत आहात. तसेच आता तीन रिव्ह्यूचाही नियम केला आहे. जर सचिन तेंडुलकरच्या काळात हाच नियम असता तर सचिनने एक लाखहून अधिक धावा केल्या असत्या.

शोएब अख्तरने पुढे म्हटले आहे की, सचिन तेंडुलकरने पूर्वी सगळ्या गोलंदाजांचा सामना केला आहे. अनेक गोलदाजांसोबत त्याने सामने खेळले आहेत. सचिनचे खरोखर आता मला वाईट वाटत आहे. सचिनने सुरुवातीला वसीम अक्रम आणि वकार युनूसच्या गोलंदाजीचा सामना केला आहे. शेन वॉर्न, ब्रेट ली आणि शोएब अख्तरच्याविरुद्धही सचिन खेळला आहे. यांच्यानंतर सचिन नव्या वेगवान गोलंदाजांसोबतही खेळला आहे. यामुळे सचिन तेंडुलकरला मी खूप चांगला खेळाडू मानतो असे शोएब अख्तर म्हणाला आहे.

सचिन तेंडुलकरने बाऊन्सरच्या संख्येत वाढ करण्याची मागणी केली होती असे शोएब अख्तरने सांगितले आहे. तसेच क्रिकेटमध्ये समतोल साधायचा असेल तर बाऊन्सर्सची संख्या वाढवली पाहिजे असे शोएब अख्तर म्हणाला. जेव्हा क्रिकेटमध्ये टी-२० क्रिकेटचा फॉर्मेट नव्हता तेव्हा एक संघ वर्षातून १२ ते १५ कसोटी सामने खेळत होता. मात्र टी-२० फॉर्मेट आल्यानंतर कसोटी सामन्यांची संख्या कमी झाली आहे. तसेच पूर्वी गोलंदाजही फीट होते असे शोएब अख्तर म्हणाला आहे.


हेही वाचा : IND vs WI: अहमदाबादमध्ये तब्बल १० वर्षानंतर टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज आमनेसामने

First Published on: January 28, 2022 4:40 PM
Exit mobile version