सिंधू, श्रीकांत जपान ओपनच्या दुसऱ्या फेरीत

सिंधू, श्रीकांत जपान ओपनच्या दुसऱ्या फेरीत

सौजन्य - Hello Tricity

मंगळवारपासून सुरू झालेल्या जपान ओपनमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी चांगली सुरूवात केली आहे. भारताचे आघाडीचे खेळाडू पी. व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय या तिघांनीही पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे.

चुरशीच्या सामन्यात सिंधू विजयी 

महिला एकेरीच्या सामन्यात तिसऱ्या सीडेड सिंधूने जपानच्या सायाका टाकाहाशी हिचा २१-१७, ७-२१, २१-१३ असा पराभव केला. या सामन्याचा पहिला सेट अगदी चुरशीचा झाला. पण सिंधूने मोक्याच्या क्षणी चांगला खेळ करत हा सेट २१-१७ असा जिंकला. पण दुसऱ्या सेटमध्ये टाकाहाशीने अप्रतिम खेळ केला.  सिंधूकडे तिच्या फटाक्यांचे उत्तर नव्हते. त्यामुळे टाकाहाशीने हा सेट ७-२१ अशा मोठ्या फरकाने जिंकला. त्यामुळे हा सेट तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये गेला. या सेटमध्ये सिंधूने आपला अनुभव पणाला लावला. त्यामुळे तिने हा सेट २१-१३ असा जिंकत सामनाही जिंकला.

 

श्रीकांत, प्रणॉयचा सहज विजय 

पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतने चीनच्या युक्सींग ह्युआंग याचा २१-१३, २१-१५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तर एचएस प्रणॉयने एशियाडमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या जॉनथन क्रिस्टी याचा २१-१८, २१-१७ असा पराभव करत स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

 

First Published on: September 11, 2018 7:40 PM
Exit mobile version