#MeToo in BCCI: सौरव गांगुलीने बीसीसीआयला झापले

#MeToo in BCCI: सौरव गांगुलीने बीसीसीआयला झापले

सौरव गांगुलीची प्रकृती बिघडली; छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल

#MeToo मोहीम भारतात चांगलीच मोठी होत असल्याचे पहायला मिळत आहे. ही मोहीम आता केवळ बॉलिवूडसाठी मर्यादित राहिलेली नाही. राजकीय क्षेत्र, आयटी क्षेत्र आणि आता क्रीडा क्षेत्रातही ही मोहीम जोर धरू लागली आहे. इतर क्षेत्रातली छेडछाडीची, लैंगिक शोषणाची प्रकरणेदेखील यामुळे समोर आली आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळदेखील (बीसीसीआय) त्याला अपवाद राहिलेले नाही. बीसीसीआयचे कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. परंतु हे प्रकरण बीसीसीआय योग्य पद्धतीने हाताळत नसल्याचा आरोप भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने केला आहे. या प्रकरणावरुन बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीने बीसीसीआयला चांगलेच झापले आहे.

वाचा – #MeToo च्या विळख्यात अडकली मराठी अभिनेत्री

बीसीसीआयची प्रतिमा खराब होत आहे

बीसीसीआयचे कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. बीसीसीआय ज्या पद्धतीने आणि गतीने हे प्रकरण हाताळत आहे, त्यावर गांगुलीने नाराजी व्यक्त केली आहे. गांगुलीने याबाबत बीसीसीआयला एक पत्रदेखील पाठवले आहे. गांगुलीने या पत्रात कोणाचेही नाव लिहिलेले नाही. परंतु लैंगिक अत्याचाराच्या आरोपाबाबत चिंता व्यक्त केली आहे. शिवाय तो म्हणला आहे की,” लैगिंक अत्याचाराच्या आरोप किती खरे किती खोटे, हे मला माहित नाही. परंतु, या प्रकरणावरुन बीसीसीआयची प्रतिमा खराब होत आहे.

First Published on: October 31, 2018 10:52 AM
Exit mobile version