BAN vs SA: दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने उडवला बांगलादेशचा धुव्वा, मालिकेत साधली १-१ अशी बरोबरी

BAN vs SA: दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने उडवला बांगलादेशचा धुव्वा, मालिकेत साधली १-१ अशी बरोबरी

जोहान्सबर्ग येथे खेळण्यात आलेल्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा सात विकेट्सने धुव्वा उडवला. प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय बांगलादेश संघाने घेतला होता. परंतु बांगलादेश संघाने ५० ओव्हर्समध्ये नऊ गडी गमावून १९४ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने आव्हानांचा पाठलाग करत ३७.२ ओव्हर्समध्ये सात गडी राखत बांगलादेशचा पराभव केला. त्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १-१ अशी बरोबरी साधली आहे. उभय संघांमधील निर्णायक सामना आता २३ मार्च रोजी सेंच्युरियन येथे होणार आहे. त्यानंतर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे.

बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना खराब सुरूवात केली होती. ३४ धावांवर बांगलादेशचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. कर्णधार तमीम इक्बालने एक धाव केल्यानंतर तो बाद झाला, लिटन दासने १५ धावा, शकिब अल हसनने शून्य धावा, मुशफिकुर रहीमने ११ धावा आणि यासिर अलीने २ धावा केल्या. यानंतर महमुदुल्लाह आणि अफिफ हुसैन यांनी बांगलादेशचा डाव सांभाळला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. महमुदुल्लाह २५ धावा करून बाद झाला. त्याचवेळी अफिफने अर्धशतक झळकावले. अफिफने मेहंदी हसनसोबत सातव्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली.

अफिफ १०७ बॉल्समध्ये ७२ धावा करून बाद झाला. त्याने नऊ चौकार मारले. त्यानंतर मेहंदी हसन ३८ धावा करून बाद झाला. शोरीफुल इस्लाम दोन धावा करून बाद झाला. तर तास्किन अहमद नऊ धावांवर नाबाद राहिला आणि मुस्तफिझूर रहमानने दोन धावा केल्या. परंतु तो सुद्धा नाबाद राहिला.

दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने पाच विकेट्स घेतले. त्याने वनडेतील दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या. यावेळी लुंगी एनगिडी, वेन पारनेल, तबरेझ शम्सी आणि रुसी व्हॅन डर डुसेन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

दरम्यान, १९५ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली. यानेमन मलान आणि क्विंटन डी कॉक यांनी ८६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मलान २६ धावा करून बाद झाला. परंतु डी कॉकने शानदार खेळी करत ६२ धावा केल्या.


हेही वाचा : Russia Ukraine War: चर्चा झाली नाही तर तिसरे महायुद्ध अटळ, झेलेन्स्कींचा रशियाला इशारा


 

First Published on: March 21, 2022 11:00 AM
Exit mobile version