Coronavirus: दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ आयसोलेशन कक्षात!

Coronavirus: दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ आयसोलेशन कक्षात!

Coronavirus: आफ्रिकेचा संपुर्ण संघ आयसोलेशन कक्षात!

भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायला आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. पावसामुळे धर्मशाळा येथील पहिला सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर देशातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारत आणि आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका बीसीसीआयने रद्द केली. त्यामुळे आफ्रिकेच्या संघाला कोलकाता विमानतळावरुन मायदेशात पाठवण्यात आले. आफ्रिकेच्या खेळाडूंना मायदेशात गेल्यानंतर आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या खेळाडूंना १४ दिवस कोणालाही भेटता येणार नाही आहे.


हेही वाचा – Coronavirus: मुंबईत आढळला करोनाचा नवा रुग्ण

करोना विषाणू वाऱ्यासारखा जगभरात पोहचला आहे. करोनामुळे अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक खेळाडूंना करोनाची लागण देखील झाली आहे. त्यामुळे आफ्रिकेचे खेळाडू कोणताही धोका स्विकारण्यास तयार नाहीत. भारतातून मायदेशात परतल्यानंतर आफ्रिकेच्या सर्व खेळाडूंना दक्षिण आफ्रिका संघाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शुएब मांजरा यांनी १४ दिवस एकटे राहण्यास सांगितले आहे.

करोनामुळे अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. भारतातील आयपीएल स्पर्धादेखील पुढे ढकलण्यात आली. तसेच फूटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, टेनीस आदी खेळांच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.

 

First Published on: March 18, 2020 9:03 PM
Exit mobile version