Coronavirus: मुंबईत आढळला करोनाचा नवा रुग्ण

राज्यातील रुग्णांची संख्या ४३ वर

100 new coronavirus positive patient found in mumbai
CoronaVirus: गेल्या २४ तासात मुंबईत कोरोनाचे १०० नवे रुग्ण, आकडा ५९०वर!

राज्यातील करोनाचा संसर्ग वाढत चालला असून आज करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुबईमधील घाटकोपरच्या एका महिलेला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. करोनाची लागण झालेली महिला करोनाग्रस्ताच्या संपर्कात आली होती. त्यामुळे तीला करोनाची लागण झाली. दरम्यान, मुंबईतील करोना रुग्णांची संख्या आता ८ वर गेली आहे. मुंबईतील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये एकूण ८ करोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात आतापर्यंत एकूण ४३ करोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

घाटकोपर विभागातील ६८ वर्षीय महिलेचं बुधवारी करोना पॉझिटिव्ह म्हणून निदान केले गेले. ही महिला मंगळवारी निदर्शनास आलेल्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने तिलाही करोनाची लागण झाली. या महिलेने आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही.

पुण्यात आढळला एक रुग्ण

३२ वर्षीय महिला नेदरलँडहून दुबई मार्गे पुण्यात आली. ही महिला करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यापाठोपाठ मुंबईतही एका रुग्णाची मंगळवारी पॉझिटिव्ह म्हणून नोंद करण्यात आली आहे. बुत्यानुसार, मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ८ जणांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे:-
पिंपरी चिंचवड मनपा – १०
पुणे मनपा ८
मुंबई ८
नागपूर ४
यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण प्रत्येकी ३
रायगड, ठाणे, ,अहमदनगर, औरंगाबाद प्रत्येकी १
एकूण: ४३

राज्यात ५८ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकुण १ हजार २२७ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ९५८ जणांना भरती करण्यात आले होते. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ८६५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.


हेही वाचा – माध्यमांनी संवेदनशील राहावं; अर्जुन कपूरचं आवाहन

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येत आहे. त्यातील लक्षणे असणा-या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १ हजार २२७ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.