Padma Awards 2020 : पद्मश्री पुरस्कार घेऊन बसला फुटपाथवर; माझ्यावर अन्याय…

Padma Awards 2020 : पद्मश्री पुरस्कार घेऊन बसला फुटपाथवर; माझ्यावर अन्याय…

काही ऑलिम्पियन खेळांडूना काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. पण कर्णबधीर वीरेंद्र सिंग हे दिल्लीतील हरियाणा भवनासमोर पद्मश्री, अर्जुन पुरस्कार घेऊन फुटपाथवर बसल्याचे पहायला मिळाले. माझ्यावर अन्याय झालाय असे सांगत वीरेंद्र यांनी हरियाणा सरकारवर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले हरियाणा सरकार माझ्यासोबत भेदभाव करत आहे. त्यांनी केलेल्या या कृत्याची मोठी चर्चा होत आहे. त्यांच्यासोबत सन्मान मिळालेल्या व्यक्तींमध्ये दिल्लीत चार हजार मृतदेहांवर अंतिम संस्कार करणाऱ्या जितेंद्र शंटी यांचाही समावेश आहे. पद्मश्री मिळालेले जितेंद्र शंटी समाधानी आहेत. पण कर्णबधीर ऑलिम्पियन वीरेंद्र सिंग फुटपाथवर का बसलेत याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

वीरेंद्र सिंग यांनी ट्विटच्या माध्यमातू म्हटले की, “मानणीय मुख्यमंत्री श्री मनोहर लाल खट्टर मी दिल्लीतील आपल्या हरियाणा भवनाच्या फुटपाथवर बसलो आहे आणि इथून तोपर्यंत हलणार नाही जोपर्यंत तुम्ही कर्णबधीर खेळाडूंना पॅरा खेळाडूंसोबत समान अधिकार देणार नाही. जर केंद्र सरकार आम्हाला समान अधिकार देते तर तुम्ही का नाही”? असा प्रश्न करत विरेंद्र यांनी हरियाणा सरकारवर निशाणा साधला.

तर कुस्तीमध्ये तीन वेळा कर्णबधीर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या वीरेंद्र सिंग यांना ९ नोव्हेंबरला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. आणि दोन दिवसांतच ते पुरस्कार घेऊन फुटपाथवर बसले. वीरेंद्र यांना बोलता आणि ऐकताही येत नाही. पण त्यांच्या हातात असणारी पदके आणि द्रोण पुरस्कार हे त्यांच्या कुस्तीतील योगदानामुळेच पद्मश्री पुरस्काराची साक्ष सांगतात. त्यांनी हरियाणा सरकारवर आरोपांची मोठी यादीच लावली आहे.


हे ही वाचा:Badminton : देशांतर्गत बॅडमिंटन हंगाम दोन दशकानंतर होणार सुरूवात


 

First Published on: November 11, 2021 9:41 PM
Exit mobile version