नाशिकच्या सार्थक साखलाला वरिष्ठ गट जिम्नॅस्टिक स्पर्धेत कांस्यपदक

नाशिकच्या सार्थक साखलाला वरिष्ठ गट जिम्नॅस्टिक स्पर्धेत कांस्यपदक

नाशिकच्या सार्थक साखला याने ५४ वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद व निवडचाचणी जिम्नॅस्टिक स्पर्धत पोमेल हॉर्स क्रीडा प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक असोसिएशनच्या मान्यतेने जिम्नॅस्टिक्स असोसिएशन ठाणे,श्रावण स्पोर्ट्स अकॅडमी ठाणे व भोईर जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ते २० जानेवारीदरम्यान करण्यात आले होते.

स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्हातील ४०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सार्थकने पोमेल हॉर्स क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत नाशिक जिल्ह्याला कांस्यपदक मिळवून दिले. सार्थक नाशिकच्या प्रबोधन इंटरनॅशनल जिम्नॅस्टिक सेंटर चंदसीचा खेळाडू आहे.त्याला राष्ट्रीय जिम्नॅस्टिक प्रशिक्षक प्रबोधन डोणगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.

फेब्रुवारी महिन्यात हैदराबाद येथे होणार्‍या ५४ राष्ट्रीय जिम्नॅस्टिक अजिंक्यपद व निवड चाचणीसाठी सार्थक साखला याची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष शाहू खैरे, सचिव राकेश केदारे, किरण कवीश्वर, संदिप शिंदे यांनी अभिनंदन केले.

First Published on: January 23, 2020 1:18 AM
Exit mobile version