सुमार कामगिरीमुळे अजिंक्य रहाणेची कर्णधार पदावरुन हकालपट्टी

सुमार कामगिरीमुळे अजिंक्य रहाणेची कर्णधार पदावरुन हकालपट्टी

सुमार कामगिरीमुळे अजिंक्य रहाणेची कर्णधार पदावरुन हकालपट्टी

आयपीएलच्या १२ व्या मोसमात राजस्थान रॉयलला फारशी चांगली कामगिरी न करता आल्यामुळे हा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. राजस्थानने या मोसमात आठ सामने खेळले आणि या आठ सामन्यांपैकी फक्त दोन सामन्यांध्ये राजस्थानला जिंकता आले आहेत. तर सहा सामन्यांमध्ये राजस्थानचा पराभव झाला. त्यामुळे अजिंक्य रहाणेची कर्णधार पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. आता अजिंक्यच्या जागेवर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला कर्णधार पदाचे सुत्र देण्यात आले आहे.

काय म्हणाले संघाचे मालक?

अजिंक्य रहाणेला पायउतार केल्यानंतर राजस्थान रॉयल संघाचे मालक जुबिन भरुचा म्हणाले की, ‘अजिंक्य चांगला खेळाडू आहे आणि यापुढेही तो चांगली कामगिरी करणार. २०१८ साली त्याच्या नेतृत्वखाली राजस्थान संघाने चांगली कामगिरी केली होती. तो नेहमी संघाचा एक महत्त्वाचा घटक असून स्टीव्हला संघात मौल्यवान मदत करेल. स्टीव्ह हा जगभरातील यशस्वी कर्णधारांपैकी एक कर्णधार आहे. त्याच्याजवळ चांगला अनुभव आहे. कोणत्याही परिस्थितीत तो सामन्याची धूरा सांभाळू शकतो. आम्हाला विश्वास आहे की तो राजस्थानला जिंकवण्यासाठी महत्त्वाची कामगिरी करेल.’ आज राजस्थानचा मुंबई सोबत सामना खेळला जाणार आहे. प्लेऑफसाठी राजस्थानला हा सामना जिंकणे फार गरजेचे आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर संघात बदल करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

अजिंक्य रहाणेच्या ‘अच्छे दिन’वर प्रश्नचिन्ह

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी अजिंक्य रहाणेला वगळण्यात आले आहे. २०१४ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत अजिंक्य रहाणे खेळला होता. परंतु, यावर्षी त्याची संधी हुकली. याशिवाय आयपीएलच्या गेल्या मोसमात रहाणेला कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली होती. गेल्यावर्षी चांगल्या कामगिरीमुळे यावर्षीदेखील अजिंक्यला कर्णधार पद दिले गेले होते. मात्र, या मोसमात अजिंक्यच्या सुमार कामगिरीमुळे त्याला कर्णधार पदावरुन पायउतार करण्यात आले आहे. त्यामुळे आता अजिंक्य रहाणेचे पुन्हा अच्छे दिन कधी येतील? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

First Published on: April 20, 2019 3:46 PM
Exit mobile version