बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या दैनिक भत्त्यात भरघोस वाढ, तब्बल 7 वर्षानंतर BCCIचा मोठा निर्णय

बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या दैनिक भत्त्यात भरघोस वाढ, तब्बल 7 वर्षानंतर BCCIचा मोठा निर्णय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अधिकाऱ्यांच्या दैनिक भत्त्यात भरघोस वाढ केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, खजिनदार आणि सरचिटणीस यांच्या परदेश दौऱ्यासह रोजचा खर्च 82 हजार इतका वाढवण्यात आला आहे. या व्यतिरिक्त या सर्वांना आता विमानातून प्रथम श्रेणीतून प्रवास करता येणार आहे आणि तोही खर्च BCCI उचलणार आहे.

BCCIची कालच बैठक पार पडली आणि त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी ऑक्टोबर 2023 पासून होणार आहे. 7 वर्षांनातर बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या दैनिक भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांना 750 डॉलर दैनिक भत्ता मिळायचा. BCCI तिजोरीच्या चाव्या भाजपा नेते आशिष शेलार यांच्याकडे आहेत. आशिष शेलार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीतही उतरले आहेत, परंतु आता त्यांनी BCCIच्या खजिनदारपदाची जबाबदारी स्वीकारली.

सौरव गांगुलीनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी 1983च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य रॉजर बिन्नी हे विराजमान झाले आहेत. जय शाह हे सचिवपदी कायम आहेत. बीसीसीआयला आयपीएल 2023 मधून कोट्यवधींचा नफा झालेला आहे.

प्रतीदिन मिळणारा भत्ता

परदेश दौऱ्यासाठी – 82 हजार
मिटींगसाठी – 40 हजार
कामानिमित्त प्रवास – 30 हजार
देशांतर्गत प्रवास – 30 हजार


हेही वाचा : भारतीय महिला संघाला मिळणार नवा हेड कोच, BCCIची मोठी घोषणा


 

First Published on: April 10, 2023 7:32 PM
Exit mobile version