घरक्रीडाभारतीय महिला संघाला मिळणार नवा हेड कोच, BCCIची मोठी घोषणा

भारतीय महिला संघाला मिळणार नवा हेड कोच, BCCIची मोठी घोषणा

Subscribe

भारतीय नियामक मंडळाने महिला क्रिकेट संघासाठी मोठी घोषणा केली आहे. आता भारतीय महिला संघाला नवे हेड कोच मिळणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली. आता महिला क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे. तर मुख्य प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षकाची दीर्घ काळापर्यंत नियुक्ती केली जाणार आहे. आतापर्यंत ही भरती अनौपचारिक पद्धतीने सुरु होती. तसेच काही काळानंतर सपोर्ट स्टाफचीही मुदत तात्काळ संपत होती. त्यामुळे ही मुदत दीर्घकाळापर्यंत करण्यात आली आहे.

भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये हेड कोचशिवाय खेळली होती. रमेश पवार यांना काढल्यानंतर महिला टीम हेड कोचशिवाय खेळत आहे. वर्ल्ड कपमध्ये बॅटिंग कोच ऋषिकेश कानेटकर यांनी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती.

- Advertisement -

मुख्य प्रशिक्षकाची निवड क्रिकेट सल्लागार समिती करते, तर निवडकर्ते सपोर्ट स्टाफची निवड करतात. मात्र, महिला संघाच्या सपोर्ट स्टाफ बॅटिंग, फिल्डिंग आणि बॉलिंग प्रशिक्षकांच्या बाबतीत हा नियम काटेकोरपणे पाळला जात नाही. बीसीसीआयने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या सदस्यांची तात्पुरत्या स्वरूपात महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

सर्व प्रशिक्षकांना दीर्घकालीन करार दिले जातील आणि ही तात्पुरती व्यवस्था नसेल जसे आपण यापूर्वी पाहिले आहे. यामुळे संघाला भरपूर स्थिरता मिळेल. रविवारी झालेल्या सर्वोच्च परिषदेच्या आभासी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

आयपीएल मीडिया राईट्स 48,390 कोटींना विकल्यानंतर बीसीसीआय आता 2023-2027 च्या भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे मीडिया राईट्स विकण्याची प्रक्रिया सुरू करेल. 31 मार्चपर्यंत हे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे होते. स्टारने हे राईट्स 6,138.1 कोटी रुपयांना विकत घेतले होते. यावेळी आयपीएलप्रमाणेच या मीडिया राईट्समधूनही मोठी कमाई व्हायचा बीसीसीआयचा अंदाज आहे.


हेही वाचा : IPL 2023 : आयपीएलमुळे बदलले रिंकू सिंगचे आयुष्य; पहिल्या कमाईत कर्ज फेडले, वडिलांना दिली कार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -