सुनील जोशी बीसीसीआय निवड समिती अध्यक्षपदी

सुनील जोशी बीसीसीआय निवड समिती अध्यक्षपदी

सुनील जोशी

भारताचे माजी फिरकीपटू सुनीश जोशी यांची बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच पाच सदस्यीय निवड समितीमध्ये माजी वेगवान गोलंदाज हरविंदर सिंग यांचाही समावेश करण्यात आला आहे, अशी घोषणा बीसीसीआयच्या सल्लागार समितीने बुधवारी केली. सल्लागार समितीचे मदन लाल, आरपी सिंह आणि सुलक्षणा नाईक हे सदस्य आहेत.

सल्लागार समितीने सिनियर पुरुष संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी सुनील जोशी यांच्या नावाची शिफारस केली आहे, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले. निवड समितीमध्ये सुनील जोशी हे एमएसके प्रसाद (दक्षिण विभाग) यांची, तर हरविंदर सिंग हे गगन खोडा (मध्य विभाग) यांची जागा घेतील. जोशी आणि सिंग यांच्यासह निवड समितीमध्ये जतीन परांजपे (पश्चिम विभाग), देवांग गांधी (पूर्व विभाग) आणि सरनदीप सिंग (उत्तर विभाग) यांचा समावेश आहे.

या निवड समितीच्या कामगिरीचा एका वर्षाने आढावा घेऊन सल्लागार समिती पुढील शिफारसी करेल, असेही बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. ४९ वर्षीय जोशी यांनी १९९६ ते २००१ या कालावधीत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी १५ कसोटी सामन्यांत ४१ गडी आणि ६९ एकदिवसीय सामन्यांत ६९ गडी बाद केले.

First Published on: March 5, 2020 5:33 AM
Exit mobile version