हार्दिक पांड्यावर शस्त्रक्रिया!

हार्दिक पांड्यावर शस्त्रक्रिया!

भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याला मागील काही काळापासून पाठीच्या दुखापतीने सतावले होते. शनिवारी लंडनमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता शस्त्रक्रिया झाल्याने हार्दिकला किमान ३ ते ४ महिने मैदानाबाहेर रहावे लागणार आहे. तसे झाल्यास तो थेट इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळताना दिसू शकेल.

त्याने शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करून दिली. माझ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली. तुम्हा सर्वांनी दिलेल्या सदिच्छांबद्दल मी आभारी आहे. मी लवकरच मैदानात परत येईन. तोपर्यंत माझी आठवण काढत राहा, असे त्याने आपल्या फोटोखाली लिहिले.

गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पाठीच्या दुखापतीमुळे आगामी बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेला मुकेल अशी शक्यता वर्तवली जात होतो. तसेच दुखापत गंभीर असल्याने हार्दिक उपचारासाठी इंग्लंडला रवाना होणार अशीही चर्चा सुरु होती. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये युएई येथे झालेल्या आशिया चषकात हार्दिकला पहिल्यांदा ही दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने मागील आयपीएल आणिइंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेत दमदार पुनरागमन केले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या द. आफ्रिकेविरूद्धच्या टी-२० मालिकेत पुन्हा त्याची पाठ दुखावली.

First Published on: October 6, 2019 5:29 AM
Exit mobile version