IND vs SL: टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, दीपक चाहरनंतर सूर्यकुमार यादवही संघातून बाहेर

IND vs SL: टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, दीपक चाहरनंतर सूर्यकुमार यादवही संघातून बाहेर

श्रीलंकाविरूद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरनंतर फलंदाज सूर्यकुमार यादवला टी-२० मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. वेस्ट इंडिजविरूद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यामध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. परंतु त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाल्यामुळे श्रीलंकेविरूद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत तो खेळताना दिसणार नाहीये. टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्याला २४ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे.

तिसऱ्या टी-२० सामन्यात यादवला दुखापत

क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, वेस्ट इंडिजविरूद्धचा तिसरा टी-२० सामना खेळताना त्याच्या हाताला दुखापत झाली होती. परंतु यादवला कितीपत दुखापत झाली आहे आणि तो मैदानात खेळण्यासाठी उतरणार की नाही, याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. त्यामुळे दीपक चाहरला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आणि सूर्यकुमार यादवला हाताला झालेल्या दुखापतींमुळे या दोन्ही खेळाडूंना श्रीलंकेविरूद्धच्या टी-२० मालिकेतून वगळण्यात आले आहे. दीपक चाहरला मैदानात पुन्हा एकदा खेळण्यासाठी ५ ते ६ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.

टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्ध होणाऱ्या सामन्यात १८ खेळाडूंची टी-२० साठी घोषणा केली आहे. २ खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे त्यांना रिप्लेस करण्याची शक्यता आहे. टी-२० मालिका लखनऊ २४ फेब्रुवारीपासून खेळण्यात येणार आहे. तर दुसरा आणि तिसरा सामना २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी खेळण्यात येणार आहे.


हेही वाचा : Nawab Malik Arrested : महाराष्ट्राची जनता नवाब मलिकांसोबत, महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रतिक्रिया…


 

First Published on: February 23, 2022 4:55 PM
Exit mobile version