Syed Modi Badminton : सायनाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Syed Modi Badminton : सायनाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

सायना नेहवालचा आरोप

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने सय्यद मोदी स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष एकेरीत पारुपल्ली कश्यप, समीर वर्मा, साई प्रणिथ यांनीही आपापले सामने जिंकत स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

अमोलिकाचा केला पराभव   

महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात दुसऱ्या सीडेड सायना नेहवालने भारताच्याच अमोलिका सिंग सिसोदियाचा २१-१४, २१-९ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये अमोलिकाने चांगला लढा दिला. पण सायनाने हा सेट २१-१४ असा जिंकला. तर दुसऱ्या सेटमध्ये सायनाने अमोलिकाला गुण कामवायच्या फार कमी संधी दिल्या. त्यामुळे तिने हा सेट २१-९ असा जिंकत सामनाही जिंकला.

पुनरागमन करत कश्यप विजयी 

पुरुष एकेरीत पारुपल्ली कश्यपने इंडोनेशियाच्या फिरमन अब्दुल खोलीकचा याचा ९-२१, २२-२०, २१-८ असा पराभव केला. तर साई प्रणिथने इंडोनेशियाच्या शेसर हिरेन ऋस्टविटोचा २१-१२, २१-१० असा सरळ सेटमध्ये पराभव केला. समीर वर्माने चुरशीच्या सामन्यात चीनच्या झाओ जुनपेंगचा २२-२१, २१-१७ असा पराभव केला.

रणकिरेड्डी-पोनप्पाही उपांत्यपूर्व फेरीत   

तसेच मिश्र दुहेरीत भारतीय जोडी सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनी भारताच्याच शिवम शर्मा आणि पूर्वीशा रामचा १२-२१, २१-१४, २१-१५ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
First Published on: November 22, 2018 11:16 PM
Exit mobile version