भारताच्या दिव्यांग क्रिकेट खेळाडूंनी पाकिस्तानला लोळवले

भारताच्या दिव्यांग क्रिकेट खेळाडूंनी पाकिस्तानला लोळवले

भारताच्या दिव्यांग क्रिकेट खेळाडूंनी पाकिस्तानला लोळवले

इग्लंड क्रिकेट बोर्डाने इंग्लंडमध्ये दिव्यांग क्रिकेटपटूंची टी-ट्वेटी विश्वचषक स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघाला अक्षरक्ष: लोळवले. भारतीय संघाने आठ विकेट्स राखून पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारतीय संघाच्या विजयामागे सलामीवीरांची मोठी भूमिका ठरली. संघाच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेट्ससाठी १२५ धावांची विक्रमी भागीदारी केली. त्यामुळे भारतीय संघाला सामना जिंकणे सहज शक्य झाले.

हेही वाचा – अजिंक्य रहाणे या एकमेव क्रिकेटपटूची पूरग्रस्तांना मदत

भारताने १७.१ षटकांत सामना खिशात घातला

इग्लंडमध्ये सुरु अलेल्या दिव्यांग विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहा देशांनी भाग घेतला आहे. भारत आणि पाकिस्तान सोबत इंग्लंड, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे या देशाचे संघ देखील या स्पर्धेत खेळत आहेत. दरम्यान, भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने २० षटकांत ७ बाद १५० धावा केल्या. भारताचा कर्णधार विक्रांत केणीने १५ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने जोरात सुरुवात केली. भारतीय सलामीवीरांनी पहिल्या विकेट्ससाठी १२५ धावांची भागीदारी केली. यात कुणाल फनसेने ४७ चेंडूत ५५ धावा केल्या तर वासिम खानने ४३ चेंडूत ६९ धावा केल्या. याशिवाय भारताने १७.१ षटकांत पाकिस्तानचे आव्हान पूर्ण केले.

First Published on: August 13, 2019 12:47 PM
Exit mobile version