T20 Playing Conditions : षटकांची गती कमी झाल्यास बसणार दंड, टी२० सामन्यातील नियमांमध्ये मोठे बदल

T20 Playing Conditions : षटकांची गती कमी झाल्यास बसणार दंड, टी२० सामन्यातील नियमांमध्ये मोठे बदल

T20 Playing Conditions : षटकांची गती कमी झाल्यास बसणार दंड, टी२० सामन्यातील नियमांमध्ये मोठे बदल

आयसीसीने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील नियमांमध्ये बदल (t20 playing conditions) केले असल्याची घोषणा केली आहे. १६ जानेवारी २०२२ रोजी सबीना पार्क येथे वेस्टइंडिज आणि आयरलँडमध्ये सामना होणार आहे. या सामन्यापासून बदल करण्यात आलेले नियम लागू करण्यात येणार आहेत.

आयसीसीने बदल केलेल्या नियमांनुसार पुरुष आणि महिलांच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात षटकांची गती कमी (slow over rate) झाल्यास सामना सुरु असतानाच दंड आकारण्यात येणार आहे. तसेच द्वीपक्षीय टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेमध्ये प्रत्येक डावात २.१५ मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. हा ब्रेक घ्यायचा की नाही हे दोन्ही संघांच्या संगनमताने सामना सुरु होण्यापूर्वी ठरवण्यात येईल.

षटकांच्या रेटचा नियम प्लेइंग कंडीशन कलम १३.८ मध्ये नमूद करण्यात आले आहे. हा नियम असा आहे की, क्षेत्ररक्षण करणारा संघ डावादरम्यान शेवटच्या षटकातील चेंडू निर्धारित केलेल्या वेळेतच टाकण्याच्या स्थितीमध्ये असले पाहिजे.

नवीन नियमांनुसार कोणताही संघ ओव्हर रेटमध्ये निश्चित वेळेच्या मागे नसेल तर बाकिच्या षटकांमध्ये ३० यार्डच्या बाहेर एक खेळाडू उभा असेल तर उर्वरित खेळाडू आतमध्ये उभे राहतील. सध्या पावरप्ले नंतर ३० यार्डच्या बाहेर पाच खेळाडू उभे राहू शकतात. मात्र ओव्हर रेटच्या नंतर पेनल्टी मिळाल्यावर चार खेळाडू बाहेर राहू शकतात.

आयसीसी क्रिकेट समितीकडून या नियमांची शिफारस करण्यात आली होती. जी नियमित रुपाने सगळ्या प्रकारातील नियमांमध्ये बदल करण्याबाबत होती. अशाच प्रकारचे नियम ईसीबीद्वारे आयोजित द हंड्रेड स्पर्धेत लागू करण्यात आले होते.


हेही वाचा : World Test Championship : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दक्षिण आफ्रिका पाचव्या क्रमांकावर, भारताचे स्थान धोक्यात

First Published on: January 7, 2022 3:36 PM
Exit mobile version