T20 WC AUS vs NZ Final : शूजमधून प्यायले बीअर, ऑस्ट्रेलियन खेळाडूंचं अनोखं सेलिब्रेशन

T20 WC AUS vs NZ Final : शूजमधून प्यायले बीअर, ऑस्ट्रेलियन खेळाडूंचं अनोखं सेलिब्रेशन

शूजमधून प्यायले बीअर, ऑस्ट्रेलियन खेळाडूंचं अनोखं सेलिब्रेशन

ऑस्ट्रेलियाने टी-२० विश्वचषक २०२१ चे विजेतेपद पटकावले आहे. एकदिवसीय विश्वचषक पाचवेळा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक जिंकला. दुबईत रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात अॅरॉन फिंचच्या नेतृत्वाखालील संघाने न्यूझीलंडचा आठ विकेट्स राखून पराभव केला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाने जल्लोष साजरा केला. चक्क शूजमधून बीअर पीत अनोखे सेलिब्रेशन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केले. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.

न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७३ धावांचे आव्हान दिले. न्यूझीलंडचे कठीण वाटणारे आव्हान मिशेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या वादळी अर्धशतकाने ऑस्ट्रेलियाने सहज पार केले. विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी एकमेकांवर शॅम्पेन आणि बिअर ओतली. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जल्लोषाच्या या व्हिडिओमध्ये असा देखील एक व्हिडिओ आहे. ज्यात ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉयनिस बुटात बिअर ओतून पीत आहेत. या दोन्ही खेळाडूंनी अजब पद्धतीने जल्लोष केला.

ड्रेसिंग रुममध्ये शूजमधून बीअर घेतानाचा ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा व्हिडिओ आयसीसीनं पोस्ट केला आहे. शूजमधून ड्रिंक्स घेण्याचं सेलिब्रेशन हे ऑस्ट्रेलियासाठी नवीन नाही. ऑस्ट्रेलियाचा फॉर्म्युला वन रेसर डॅनियल रिकियार्डो यानं हे सेलिब्रेशन प्रसिद्ध केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू अशा पद्धतीने सेलिब्रेशन करताना अनेकदा दिसले.

न्यूझीलंडला धूळ चारत ऑस्ट्रेलिया प्रथमच टी-२० विश्वविजेता

न्यूझीलंडला धूळ चारत टी-२० विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच आपले नाव कोरले आहे. रविवारी दुबईमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने, न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडने दिलेले १७३ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने १९ व्या षटकात पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्श आणि मॅक्सवेल या जोडीने धडाकेबाज फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना फिंच स्वस्तात माघारी फिरला. पण त्यानंतर डेविड वॉर्नरची फटकेबाजी आणि मिशेल मार्शनं केलेली अर्धशतकी (७७) खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने पहिला टी-२० विश्वचषक उंचावला. २०१० मध्ये ऑस्ट्रेलियन संघाला इंग्लंडने फायनलमध्ये पराभूत केले होते. त्यानंतर अखेर जेतेपद मिळवण्यात त्यांना यश आले.

First Published on: November 15, 2021 12:07 PM
Exit mobile version