T20 WC: शाकिब अल हसनने रचला इतिहास, टी२० मध्ये सर्वाधिक विकेट घेण्यात अव्वल

T20 WC: शाकिब अल हसनने रचला इतिहास, टी२० मध्ये सर्वाधिक विकेट घेण्यात अव्वल

T20 WC: शाकिब अल हसनने रचला इतिहास, टी२० मध्ये सर्वाधिक विकेट घेण्यात अव्वल

टी२० वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशचा स्टार खेळाडू शाकिब अल हसन याने इतिहास रचला आहे. शाकिब आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेण्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे. शाकिबने श्रीलंकाच्या लसिथ मलिंगाचा रेकॉर्ड तोडला आहे. मलिंगाहून एक विकेट जास्त घेऊन आतापर्यंत एकूण १०८ विकेट घेतले आहेत. यूएई आणि ओमान येथे आयोजित करण्यात आलेल्या टी२० सामन्यांमध्ये शाकिबने हा इतिहास रचला आहे.

स्कॉटलँड विरुद्ध बांग्लादेशच्या शाकिब अल हसन याने १७ रन देऊन २ विकेट घेतले. शाकिबच्या याच गोलंदाजीमुळे लसिथ मलिंगाला मागे टाकण्यात यश आलं आहे. सध्या टी२०मध्ये सर्व गोलंदाजांमध्ये शाकिब अव्वल स्थानी आहे. शाकिबनंतर दुसऱ्या स्थानी १०७ विकेट लसिथ मलिंगाने घेतले आहेत. तर तिसऱ्या स्थानी ९९ विकेटसह न्यूझीलंडचा साउदी आहे. चौथ्या स्थानी पाकिस्तानचा गोलंदाज शाहिद अफरीदी असून त्याने एकूण ९८ विकेट घेतले आहेत.

टी२० विकेटच्या पहिल्या पाचमध्ये भारतीय गोलंदाजांचा समावेश नाही आहे. सध्या बुमराह, शमी आणि चहल सारखे भारतीय गोलंदाज चांगली गोलंदाजी करत आहेत परंतु शाकिबचा रिकॉर्ड तोडणे आव्हानच ठरेल. शाकिब अल हसनच्या नावे आणखी एका रिकॉर्डची नोंद झाली आहे. त्याने फलंदाजीमध्ये आतापर्यंत एकूण १२ हजार धावा केल्या आहेत. हा आकडा शाकिबने तिन्ही स्वरुपाच्या सामन्यात केला आहे. तसेच सर्वच मिळून शाकिबने आतापर्यंत ६०० विकेट घेतले आहेत. यामध्ये टेस्ट सामन्यात २१५, कसोटी सामन्यात २७७ आणि टी२० सामन्यात १०८ विकेट घेतले आहेत. शाकिबने आतापर्यंत इमरान खान, जैक कॅलिस आणि कपिल देव यांसारख्या खेळाडूंनाही मागे सोडले आहे.


हेही वाचा : Ind vs Pak 2021 :भारत पाक सामन्याला वाढता विरोध, केंद्रीय मंत्र्यानेही मांडले मत


 

First Published on: October 18, 2021 6:30 PM
Exit mobile version