घरक्रीडाInd vs Pak 2021 :भारत पाक सामन्याला वाढता विरोध, केंद्रीय मंत्र्यानेही मांडले...

Ind vs Pak 2021 :भारत पाक सामन्याला वाढता विरोध, केंद्रीय मंत्र्यानेही मांडले मत

Subscribe

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये लवकरच टी २० विश्व चषकातील सामना रंगणार असला तरीही या सामन्याच्या निमित्ताने अनेक घडामोडी सध्या पहायला मिळत आहेत. सामन्याच्या आधीच एकीकडे हरभजन विरूद्ध शोएब अख्तर अशी शाब्दिक चकमक पहायला मिळाली, तिथेच दुसरीकडे मात्र हा सामनाच रद्द करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. येत्या २४ ऑक्टोबरला दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. पण सामन्याच्या आधीच भारतातून Ban Pak Cricket हा ट्रेंड होत आहे. अशातच केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही भारत आणि पाक संघाच्या दरम्यानच्या लढतीचा फेरविचार होणे गरजेचे असल्याचे मत मांडले आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर बॅन पाक क्रिकेट हा ट्रेंड सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून दहशतवादाच्या मुद्द्यावरच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघात क्रिकेटचा सामना होत नाही.

काय म्हणाले गिरीराज सिंह ?

भारत आणि पाक या दोन्ही संघात गेल्या काही वर्षांमध्ये सामने झालेले नाहीत. सध्याचे तणावलेले संबंध पाहता या सामन्याचा पुनर्विचार करण्याची गरज केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी व्यक्त केली आहे. जम्मू आणि काश्मिरमध्ये रक्तपात सुरू असताना दोन्ही संघांमध्ये कसा काय सामना होऊ शकतो अशीही विचारणा त्यांनी केली आहे. सातत्याने सामान्य नागरिकांना लक्ष्य करून हत्या करण्याचे प्रकार सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या घटनेत उत्तर प्रदेशातील एक सुतार आणि पाणीपुरी विक्रेता गोळीबार हल्ल्यात मृत्यूमुखी पडला. दोन्ही देशाच्या सीमेवर सध्या तणाव आहे. तसेच भारत पाक यांच्यातील संबंधही सध्या चांगले नाहीत. म्हणूनच मानवतेच्या दृष्टीने सामने न खेळवले जाणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

विराटचे उत्तर काय ?

भारत आणि पाक सामन्याबाबत विराट कोहलीने हा सामना माझ्यासाठी इतर कोणत्याही एका क्रिकेट सामन्यासारखा असेल अशी स्पष्टोक्ती दिली आहे. या खेळाच्या निमित्ताने सध्या खूपच चर्चा सुरू आहे. पण त्यामध्ये तिकिटांच्या विक्रीपासून ते तिकिटाच्या मागणीच्या निमित्ताने सगळ्याच गोष्टी चर्चेत असल्याचे विराट म्हणाला. याआधी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये २०१९ मध्ये विश्व चषकाच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये मुकाबला झाला होता.

आयपीएलसाठी होते पीसीबी अध्यक्षांना निमंत्रण

आशियाई क्रिकेट मजबुत करण्यासाठी काही दिवसांपूर्वी एक बैठक पार पडली होती. या बैठकीत भारताच्या वतीने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांना आयपीएलच्या शेवटच्या सामन्यासाठी हजेरी लावण्याचे निमंत्रण दिले होते. पण या सामन्याला येण्यासाठी रमीझ राजा यांनी नकार दिला होता. काही कारणास्तव हजर राहू शकणार नसल्याचे रमीझ राजा यांनी स्पष्ट केले होते.

- Advertisement -

हेही वाचा India vs Pakistan T20 World Cup 2021: भारत पाकमध्ये तूर्तास मालिका अशक्य – रमीझ राजा

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -