T20 WC 2021, Ind Vs Nam: भारतीय संघाच्या विश्वचषक मोहिमेची विजयाने सांगता

T20 WC 2021, Ind Vs Nam: भारतीय संघाच्या विश्वचषक मोहिमेची विजयाने सांगता

T20 WC 2021, Ind Vs Nam: भारतीय संघाच्या विश्वचषक मोहिमेची विजयाने सांगता

भारतीय संघाने टी-२० विश्वचषकातील प्रवास विजयासह संपला आहे. आज, सोमवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या औपचारिक सामन्यात नामीबियाला ९ गडी राखून हरवले आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफिक जिंकून पहिल्यांदा नामीबियाला फलंदाजी करण्याची संधी दिली. नामीबिया संघाने २० षटकांत ८ गडी गमावले आणि भारतीय संघाला १३३ धावाचे आवाहन दिले.

भारतीय संघाने या सामन्यात १५.२ षटकांत १३३ धावांचे लक्ष्य १ गडी गमावून पूर्ण केले. सलामीवीर के.एल. राहुलने ५४ आणि सूर्यकुमार २५ धावांवर नाबाद राहिले. उपकर्णधार रोहित शर्माने ५६ धावा केल्या. यासोबत कर्णधार विराट कोहलीने विजयासह टी-२० फॉर्मटमधील कर्णधारपदाचा शेवट केला.

यापूर्वी जडेजा आणि रविचंद्रन अश्विनने आपल्या गोलदांजीने नामीबियाचे ८ गडी गमावले. जडेजाने ३ तर अश्विनने ३ विकेट्स घेतले आणि जसप्रीत बुमराहनेही २ विकेट्स घेतले. रोहित शर्माने ३० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहित आऊट झाल्यानंतर केएल राहुलने ३६ चेंडूत २ छक्के आणि ४ चौकारासह ५४ धावा केल्या.

दरम्यान स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला होता. वरुण चक्रवर्तीच्या जागी राहुल चहरचा संघात समावेश करण्यात आला होता. रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, राहुल चहर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी अशी प्लेइंग इलेव्हन होती.

First Published on: November 8, 2021 11:03 PM
Exit mobile version