मॅचपूर्वी काढला टीम इंडियानं कुकचा ‘इलाज’

मॅचपूर्वी काढला टीम इंडियानं कुकचा ‘इलाज’

अलेस्टर कुक

बुधवारी टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यातील पहिली टेस्ट सिरीज बर्मिंगहमच्या एजबेस्टनमध्ये खेळणार आहे. पाच टेस्ट मॅचच्या या सिरीजमध्ये दोन्ही देशांची परीक्षाच आहे. विराट कोहलीला टेस्ट मॅचमध्ये आपलं वर्चस्व स्थापित करण्यासह जगभरात कुठेही टीम इंडिया उत्तम कामगिरी करू शकते हेदेखील दाखवयाचं आहे. त्यासाठी इंग्लंडच्या मागील दोन सिरीज हरण्याची साखळी तोडण्याचं आव्हान विराट सेनेसमोर आहे.

अॅलेस्टर कुक सर्वात मोठं आव्हान

इंग्लंडसमोरील आव्हानदेखील लहान नाही. २०१७ च्या सप्टेंबरनंतर इंग्लंडनं ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरुद्ध नऊ मॅचपैकी केवळ एक मॅच जिंकली आहे. तर इंग्लंडचा सर्व भार हा रूट, बेयरस्टा आणि अॅलेस्टर कुक यांच्यावरच आहे. यामध्ये भारतासाठी सर्वात मोठं आव्हान आहे तो म्हणजे ‘अॅलेस्टर कुक’. १५६ मॅचमध्ये १२१४५ रन्स बनवणारा कुक हा भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो. दरम्यान गेल्या एक वर्षात यावरचा ‘इलाज’ शोधण्यात यश मिळालं आहे. मोहम्मद सिराज हा भारतीय खेळाडू आहे ज्यानं खूप चांगल्या तऱ्हेनं कुकची विकेट मागच्या वर्षी मिळवली होती. त्यानं ज्या तऱ्हेनं कुकची विकेट काढली त्या तऱ्हेनं अभ्यास करून कुकची विकेट काढता येऊ शकते. त्याप्रमाणं भारतीय टीम रणनीती आखून कुकची विकेट घेऊ शकतात.

इंग्लंडसाठी बॉलर्सदेखील डोकेदुखी

सध्या इंग्लंडसाठी बॉलर्सदेखील डोकेदुखी ठरले आहेत. २०१४ मधील कामगिरीचा दबाव त्यांच्यावर असणार. तसंच दुसऱ्या बाजूला भारतीय टीममध्ये इंग्लंडच्या तुलनेत वरचढ बॉलर्स आहेत. मात्र पहिल्या टेस्टमध्ये भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह नसल्यामुळं कमकुवत मानण्यात येत आहे. त्यामुळं बुधवारपासून सुरु होणाऱ्या मॅचमध्ये नक्की कोणाचं वर्चस्व राहणार हे आता पाहावं लागेल.

First Published on: July 31, 2018 8:21 PM
Exit mobile version