IND Vs SA : सेंचुरियनमधील कसोटी सामन्यात प्रशिक्षक राहुल द्रविडला मिळाला सन्मान, चौथ्या दिवसाला अशी झाली सुरुवात

IND Vs SA : सेंचुरियनमधील कसोटी सामन्यात प्रशिक्षक राहुल द्रविडला मिळाला सन्मान, चौथ्या दिवसाला अशी झाली सुरुवात

विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. परंतु याचवेळी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ देखील संपला आहे.

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी सामने खेळवले जात आहेत. सेंचुरियनमधील कसोटी सामन्यात भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविडला सन्मान देण्यात आला आहे. तसेच कसोटी सामन्याची सुरूवात बेल वाजवून झाली.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, सेंचुरियनमध्ये कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी राहुल द्रविडने परंपरेनुसार बेल वाजवली आणि त्यानंतर सामन्याला सुरूवात झाली. जगभरातील अनेक स्टेडियममध्ये ही परंपरा सूरू आहे. खेळाची सुरूवात एखाद्या खास व्यक्तीकडून बेल वाजवून केली जाते. इंग्लंडचे लॉर्डस मैदान असो किंवा भारतामधील कोलकाताचे ईडन गार्डन मैदान या ठिकाणी परंपरा अद्यापही सुरू आहे.

राहुल द्रविडसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा खूप खास आहे. कारण भारतीय संघाच्या प्रशिक्षकांचा हा पहिला परदेशी दौरा आहे. राहुल द्रविडच्या रेकॉर्डबाबत सांगायचं झालं तर, दक्षिण आफ्रिकेत त्यांनी एकूण ११ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये ६२४ धावा बनवल्या असून ३० टक्के सरासरी इतक्या आहेत.

भारतीय संघाने टॉस उडवत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्यात भारताने ३२७ धावा पूर्ण केल्या आहेत. परंतु दक्षिण आफ्रिकेला १९७ इतक्या धावांवरच गुंडाळलं आहे.


हेही वाचा : राहुल गांधी पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची शक्यता ; ‘या’ महिन्यात पूर्ण होणार निवडणूक प्रक्रिया


 

First Published on: December 29, 2021 6:43 PM
Exit mobile version