IND vs ENG : भारतीय संघाची चेन्नईत ‘आऊट डोअर’ सरावाला सुरुवात 

IND vs ENG : भारतीय संघाची चेन्नईत ‘आऊट डोअर’ सरावाला सुरुवात 

रोहित शर्मा आणि विराट कोहली

भारत आणि इंग्लंड या संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका होणार असून या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहेत. सोमवारी या मालिकेच्या तयारीच्या दृष्टीने भारताच्या खेळाडूंनी आऊट डोअर (Outdoor) सरावाला सुरुवात केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी या सराव सत्राचे फोटो ट्विटरवरून शेअर केले. भारतीय खेळाडूंच्या कोरोनासाठीच्या आरटी-पीसीआर चाचण्या घेण्यात आल्या. ठराविक अंतराने झालेल्या या तीन चाचण्यांमध्ये भारताच्या खेळाडूंना कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला. तसेच भारताच्या खेळाडूंनी सहा दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला असून मंगळवारपासून त्यांना नेट्समध्ये सराव करता येणार आहे.

स्टोक्स, आर्चरचाही सराव

भारताप्रमाणेच इंग्लंडच्या खेळाडूंचे कोरोना चाचणीचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. तसेच त्यांचाही क्वारंटाईनचा कालावधी संपला असून ते मंगळवारपासून सरावाला सुरुवात करणार आहेत. मात्र, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि रोरी बर्न्स हे इंग्लंडचे खेळाडू आधीच भारतात दाखल झाले होते. त्यामुळे त्यांना मागील शनिवारपासून सराव करण्याची परवानगी मिळाली.

चार कसोटी सामने 

भारत आणि इंग्लंड या संघांमध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईला, तर अखेरचे दोन सामने अहमदाबाद येथे होणार आहेत. ही मालिका संपल्यावर हे दोन संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत आमनेसामने येतील.


हेही वाचा – IND vs ENG : पंत की साहा; पहिल्या कसोटीत ‘या’ यष्टिरक्षकाला मिळणार संधी?  


 

First Published on: February 1, 2021 10:57 PM
Exit mobile version