द्रोणाचार्य संघाला जेतेपद

द्रोणाचार्य संघाला जेतेपद

ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या ठाणे महापौर चषक व्हॉलीबॉल स्पर्धेतील १८ वर्षे वयोगटात द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकादमीने जेतेपद पटकावले. खुल्या गटात शमिका किचन्स बी संघ विजेता ठरला. या स्पर्धेत ६२ पुरुष, तर २२ महिला संघांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेच्या १८ वर्षे वयोगटातील पुरुषांच्या अंतिम सामन्यात द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकादमीने जे. के. सिंघानिया शाळेवर मात करत महापौर चषकावर नाव कोरले. द्रोणाचार्यच्या ध्रुव शेलारला सर्वोत्तम स्पायकर खेळाडूचा,अचिव्हर्स क्लबच्या गौरांग कोळीला सर्वोत्तम सेटरचा आणि सोहम ठक्करला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार मिळाला.

ठाणे गटातील पुरुष खुल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शमिका किचन बी या द्रोणाचार्य अकादमीच्याच संघाने अचिव्हर्स फाऊंडेशनचा पराभव केला. मुंबई विभागातील अंतिम लढतीत ए. आर. बॉईज संघाला पराभूत करत सेंचुरी रेयॉन या विभागाचे जेतेपद मिळवले. विजेत्या संघांना उपमहापौर पल्लवी कदम यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. महापौर नरेश म्हस्के आणि सभागृह नेते अशोक वैती यांनी अंतिम सामन्यापूर्वी उपस्थित राहून संघाना शुभेच्छा दिल्या.

अन्य गटातील विजेते
ठाणे १८ वर्षांखालील मुली गट : जे. के. सिंघानिया
ठाणे विभाग – ४० वर्षांखालील गट : आर.बी.प्रिंटर्स
ठाणे विभाग – डायरेक्ट व्हॉलीबॉल : मारुती हार्डवेअर
ठाणे विभाग महिला गट : सारा एंटरप्रायझेस

First Published on: February 7, 2020 5:47 AM
Exit mobile version