आर्चरमध्ये महान गोलंदाज होण्याची क्षमता!

आर्चरमध्ये महान गोलंदाज होण्याची क्षमता!

आर्चर

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने अ‍ॅशेस मालिकेतील दुसर्‍या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इंग्लंडला हा सामना जिंकण्यात अपयश आले, पण आर्चरने सर्वांनाच त्याच्या वेगाने प्रभावित केले. त्याने या सामन्यात ५ विकेट्स मिळवल्या. तसेच या सामन्याच्या चौथ्या दिवशी त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली.

त्याचा उसळता चेंडू ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथच्या मानेला लागला आणि तो जागेवरच कोसळला. त्यामुळे तो पाचव्या दिवशी खेळू शकला नाही. दुसर्‍या डावात आर्चरने पुन्हा एक उसळता चेंडू टाकला, जो स्मिथची जागा घेणार्‍या मार्नस लबुसचेन्गच्या हेल्मेटला लागला. या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे त्याचे इंग्लंड संघातील सहकार्‍यांनी कौतुक केले.

जोफ्राने या सामन्यात आपली छाप पाडली. त्याने या सामन्यात काही अप्रतिम षटके टाकली. तो यापुढील सामन्यांत कशी गोलंदाजी करतो, हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. त्याच्यामध्ये महान गोलंदाज होण्याची क्षमता आहे, असे इंग्लंडचा कर्णधार जो रूट म्हणाला.

तसेच इंग्लंडचा उपकर्णधार बेन स्टोक्सने आर्चरविषयी सांगितले, यापेक्षा चांगले पदार्पण होऊ शकते असे मला वाटत नाही. त्याने ज्याप्रकारे गोलंदाजी केली, ते पाहून खूप मजा आली. तो आमच्या संघात असणे, हे आमचे भाग्य आहे.

First Published on: August 20, 2019 5:15 AM
Exit mobile version