Mohammad Siraj : मोहम्मद सिराजला ट्रोल केल्यानंतर आरसीबीच्या डायरेक्टरनं केलं मोठं वक्तव्य

Mohammad Siraj : मोहम्मद सिराजला ट्रोल केल्यानंतर आरसीबीच्या डायरेक्टरनं केलं मोठं वक्तव्य

आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या १५ व्या हंगामाचे सर्व सामने संपले आहेत. या सामन्यात काही संघ बाहेर गेले तर काहींनी विजयाच्या जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. क्वालिफायर -२ मधेय राजस्थान रॉयल्स (RR) आणि आरसीबी (RCB) हे दोन संघ ऐकमेकांना भिडले होते. मात्र, राजस्थान संघाने आरबीसीचा पराभव केला. त्यानंतर राजस्थान संघाने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, आरसीबीच्या पराभवानंतर रॉयल्स चॅलेंजर बंगळुरूचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj ) चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. मोहम्मद सिराजला ट्रोल केल्यानंतर आरसीबीच्या डायरेक्टरनं मोठं वक्तव्य केलं आहे.

सोशल मीडियावर (Social Media) मोहम्मद सिराजला प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. काही चाहत्यांनी त्याच्यावर कॉमेंट्स केल्या आहेत. तर काही चाहत्यांनी सिराजची बाजू घेतली आहे. कुणी फेसबुक पोस्ट केली आहे तर कुणी ट्विट सुद्धा केलंय. त्यामुळे राजस्थान संघाच्या हातातून पराभव होणं हे सिराजला चांगलंच महागात पडलं आहे.

या सामन्यात सिराजने फक्त २ ओव्हर्स टाकल्या. मात्र, राजस्थान संघाच्या फलंदाजांनी या २ ओव्हर्समध्ये ३१ धावा केल्या. त्यानंतर क्रिकेटचे संचालक माईक हेसन हे मोहम्मद सिराजबाबत म्हणाले की, या सामन्यानंतर मोहम्मद सिराजचा आत्मविश्वास नक्कीच कमी झाला आहे. तो लवकरच पुन्हा एकदा चांगल्या खेळीने सुरूवात करेल.

मोहम्मद सिराज चांगला गोलंदाज आहे. परंतु हा हंगाम त्याच्यासाठी चांगला राहिलेला नाहीये. मात्र, आगामी काळात तो जोरदारपणे पुनरागमन करेल. या हंगामात तो विकेट घेण्यात अपयशी ठरला, असंही माईक हेसन म्हणाले.

आयपीएल स्पर्धेतीतून आरसीबी बाहेर पडताच विराट कोहलीने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांचे आभार मानलं आहेत. यासोबत त्याने भावुक मेसेजदेखील केला आहे. चाहत्यांमुळं स्पर्धा खास ठरत असते. असे त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आयपीएल २०२२ मधून बाहेर पडणारा ८वा संघ ठरला आहे. आरसीबीने या हंगामात एकूण १६ सामने खेळले. त्यापैकी ९ जिंकले आणि ७ सामने हारले. राजस्थान विरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर विराट कोहलीने चाहत्यांसाठी भावुक मेसेज केला आहे.


हेही वाचा : भारतीय हॉकी संघाने जपानचा घेतला बदला, सुपर 4 स्टेजमध्ये मॅचमध्ये 2-1 ने विजय


 

First Published on: May 29, 2022 3:28 PM
Exit mobile version