घरक्रीडाभारतीय हॉकी संघाने जपानचा घेतला बदला, सुपर 4 स्टेजमध्ये मॅचमध्ये 2-1 ने...

भारतीय हॉकी संघाने जपानचा घेतला बदला, सुपर 4 स्टेजमध्ये मॅचमध्ये 2-1 ने विजय

Subscribe

भारतीय हॉकी संघाने (Indian Hockey Association) सुपर 4 स्टेजच्या पहिल्या मॅचमध्ये जपानला हरवून लीग स्टेजमधल्या पराभवाचा बदला घेतला. भारतीय हॉकी (Indian Hockey) संघाने जपानवर 2-1ने विजय मिळवला. ग्रुप स्टेजमध्ये जपानने भारताचा 2-5 असा पराभव केला होता.

या मॅचमध्ये मंजीत आणि पवन या दोघांनी भारतासाठी दोन गोल केले. मंजीतने सातव्या आणि पवनने 34 व्या मिनिटाला गोल केला. जपानसाठी ताकुमा नीवाने 17 व्या मिनिटला गोल केला. जपानला या सामन्यात पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र, त्यांना फक्त एका पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करता आले. भारताला एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र, या पेनल्टी कॉर्नरचे त्यांना गोलमध्ये रुपांतर करता आले नाही.

- Advertisement -

मंजीतने सातव्या आणि पवनने 34 व्या मिनिटाला गोल केला. जपानसाठी ताकुमा नीवाने 17 व्या मिनिटाला गोला केला. जपानला सपूर्ण सामन्यात 5 पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र, त्यांना फक्त एकाच पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करता आले. तर भारताला एक पेनल्टी कॉर्नर मिळाला, त्याचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही.

- Advertisement -

पुढचा सामना मलेशिया विरुद्ध – 

जपानने लीग स्टेजमध्ये आपले सर्व सामने जिंकले होते. पूल ए मध्ये ते टॉपवर होते. भारत आणि पाकिस्तान दोघांचे चार पॉइंट्स होते. भारताने मोठ्या गोल फरकामुळे सुपर 4 मध्ये प्रवेश केला होता. भारताशिवाय सुपर 4 मध्ये जपान, दक्षिण कोरिया आणि मलेशिया हे संघ आहेत. या संघांचे परस्पराविरुद्ध सामने होतील. टॉपच्या दोन टीम्समध्ये फायनल मॅच होईल. भारताचा पुढचा सामना रविवारी मलेशिया विरुद्ध होईल.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -