Beijing Winter Olympics :ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकणाऱ्या चार देशांना किंमत मोजावी लागेल; चीनची धमकी

Beijing Winter Olympics :ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकणाऱ्या चार देशांना किंमत मोजावी लागेल; चीनची धमकी

२०२२ मध्ये बीजिंग येथे होणाऱ्या हिवाळी (winter) ऑलिम्पिकच्यापूर्वी चीनला आणखी एक मोठा झटका बसला आहे. अमेरिका, ग्रेट ब्रिटेन आणि ऑस्ट्रेलियानंतर आता कनाडाने देखील राजनैतिक बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. दरम्यान याबाबत ड्रॅगनच्या बाजूनेही संताप व्यक्त केला जात आहे. बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकणाऱ्या चार देशांना किंमत मोजावी लागेल असे चीनने गुरुवारी सांगितले. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकाने यापूर्वीच बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. तर ग्रेट ब्रिटेन आणि कनाडा या देशांनी बुधवारी याबाबत घोषणा केली होती.

कनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबतची माहिती दिली. ट्रुडो यांनी म्हंटले की चीनमध्ये सातत्याने होत असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनामुळे कॅनडा चिंतेत आहे. या विरोधात आम्ही हिवाळी ऑलिम्पिकसाठी कोणताही खेळाडू पाठवणार नाही. कनाडाच्या पूर्वी ब्रिटेनने बहिष्कार टाकला होता. त्यांनी सांगितले होते की आमच्या देशातून कोणताच राजनियक चीनला जाणार नाही. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोबतच हे देखील सांगितले होते की, “मलाही नाही वाटत खेळांवर बहिष्कार टाकणे योग्य आहे मात्र हे सरकारचे धोरण आहे”.

आणखीही काही देश टाकू शकतात बहिष्कार

बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकसाठी आणखीही काही देश बहिष्कार टाकू शकतात. यापूर्वीही काही ऑलिम्पिक खेळांमध्ये असे झाले आहे. कित्येक देशांना अन्य देशांचा बहिष्कार सहन करावा लागला होता. १९५६ मेलबर्न, १९६४ टोकियो, १९७६ मॉन्ट्रियल, १९८० मॉस्को, १९८४ लॉस एंजिल्स आणि १९८८ सियोलमध्ये युध्द आक्रमण आणि रंगभेदसारख्या कारणांमुळे विविध देशांनी ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला होता.


हे ही वाचा:  http://Rohit Sharma : हिटमॅन कर्णधार झाल्याने ‘या’ खेळाडूच्या आशा पल्लवीत; विराटच्या नेतृत्वात नव्हती संधी


 

First Published on: December 9, 2021 4:17 PM
Exit mobile version